प्रकाश आंबेडकर यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आज दिवसभर वंचित बहुजन आघाडीचे  प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सातारा शहरात उमटत होते.सायंकाळीमराठा क्रांती मोर्चाचे भागवत कदम यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.गुन्हा दाखल करताना मराठा क्रांती मोर्चा राजधानी साताराचे सर्व जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की आज दिवसभर प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सातारा येथे उमटलेहोते.मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकानी निषेध नोंदवून गुन्हा दाखल करण्याची मागणी सातारा शहर पोलिसांकडे केली. पोलीस गुन्हादाखल करण्यास टाळाटाळ करत होते.त्यावेळी कार्यकर्ते आक्रमक होऊन पोलीस ठाणे सोडण्याचा पवित्रा घेतला.त्यावेळी सायंकाळी उशिरा प्रकाश आंबेडकर यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही प्रक्रिया सुरू असताना मराठा क्रांतीमोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *