आमदार शशिकांत शिंदे तुमच्यामुळे नाही तर आम्हा ग्रामस्थांमुळेच हा रस्ता मंजूर झाला:सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी घेतलाखरपूस समाचार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

साताराप्रतिनिधी

कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे तुम्ही आमदार होता. सातारालोणंद रस्त्यावरून कित्येक वेळा गेला .पण तुम्हाला रस्त्यावर पडलेलेखड्डे कधी जाणवले नव्हते. आम्हा ग्रामस्थांनी कित्येकदा याच रस्त्यासाठी आंदोलने केली,मोर्चे काढले. कुणीही केले की मीच केले, अशीबतावणी करण्यात तुम्ही माहिर आहे. फक्त गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना हाताशी धरून सत्तेची फळे ओरबाडून खाल्लीराव,तुम्ही.गावांचा नाही, तुमच्या मागे  फिरणाऱ्यांची कामे केली. , बरोबर ना

जरा आत्मपरिक्षण करून बघा, बरे तुम्ही. केलेल्या आणि झालेल्या कामांचे श्रेय घ्यायची सवय लागली आहे ना, तुम्हाला.

तुम्ही कसले श्रेय घेता .सर्वांनी ओळखले आम्हा ग्रामस्थांमुळेच हा रस्ता मंजूर झाला आहे,अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते मदनसाबळे यांनी राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचा खरपूस समाचार पत्रकाद्वारे घेतला.

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कोरेगावचे तुम्ही आमदार होता.परंतु तुम्हाला ग्रामस्थांना रस्ते,पाणी,गटर,वीज या मूलभूत सुविधादेण्याकरिता तुमचा सतत दुजाभाव राहिला गेला.तुम्ही गर्दी करून नेहमी फिरत राहिला.पण त्याच गर्दीतल्या जनतेला ज्या रस्त्यावरूनजावे लागत आहे.ते रस्ते खड्डेयुक्त तसेच होते.कित्येक वेळा सातारालोणंद रस्त्यावरून ये जा करता. असता तुम्हाला कधी रस्त्यालापडलेला खड्डा जाणवला आहे का?,दिसला आहे का?,तुमच्या आमदारकीच्या कार्यकाळात किंवा मंत्रिपदाचा कार्यकाळात देखिल तुम्हीढुकून  या रस्त्याकडे पाहिले नाही.कारण तुम्हाला जनतेच्या सुखदुःखाचे काही घेणे देणे नव्हते.जनता पडलेल्या खड्यातून गेली पाहिजे, जनता तडफडून मेली पाहिजे अशी तुमची अपेक्षा असावी.शेवटी तुमच्यासारख्या आमदारांनी दुर्लक्ष केल्याने जनतेनेच स्वतःच्याहक्कासाठी अनेकदा सातारा लोणंद रस्त्यासाठी आंदोलन केली. या आंदोलनाकडे सुद्धा तुम्ही दुर्लक्ष केले.आठवा आमदार शशिकांतशिंदे साहेब ज्या वेळी रस्त्यावर लोक आंदोलन करत होते तेव्हा तुमची गाडी बगल देऊन एका कार्यक्रमाला गेली.कसा हो तुमच्यामुळेरस्ता झाला.बॅनर बाजी करून काही साध्य होत नाही.कोंबड झाकून ठेवलं तरी दिवस उगवायचा राहत नाही.तुम्ही जे काम केलच नाही तेमी केलं म्हणून नका कोरेगावच्या जनतेने ओळखली आहे.म्हणून तुम्हालाआमदारकीपासून खड्यासारखे बाजूला ठरले.आजपर्यंत सातारालोणंद रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळं ज्यांचे अपघात झाले ज्यांचे जीवगेले त्यास तुम्ही कारणीभूत आहात. तुम्हाला कशी समजणार हो सर्वसामान्य जनतेची दुःखतुम्ही म्हणता रस्ता मी मंजूर केला.कसा केला जरा सांगता का?,काही कोणत्या सभागृहात सातारालोणंदरस्त्याबाबत आवाज उठवला त्याचे मिनिटं असतील तर जाहीर करता का?,उगाच जनतेने केलेल्या कामाचे श्रेय कसे घेता?,म्हणूनचतुम्हाला जनताच बरोबर जागा दाखवते आहे.तुमच्या आमदारकीच्या काळात सातारालोणंद रस्त्यावर एक तरी खड्डा मुजवला आहेका?, अशी जर काम करत असता तुम्ही तर जनतेला गेला दहा वर्षात खड्यातूनजावे लागले नसते.जनतेला खड्यात ठेवता म्हणून तुम्हाला ही जनतेने 2019च्या निवडणुकीत खड्यात ठेवले. आमदार शशीकांत शिंदे तुम्ही अगोदर सर्वसामान्य जनतेची कामे करा.मग जनतेला सांगा मीहे केलं ते केलं म्हणून नुसतंच मिरवू नका.काम कुणी मंजूर केलं आणि श्रेय घेतंय कोण हे सारं कोरेगावच्या जनतेने ओळखले आहे,अशाशब्दात सणसणीत चपराक आमदार शशीकांत शिंदे यांना सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी लगावली.

मदन साबळे

अध्यक्ष छत्रपती उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा,

जिल्हाध्यक्ष, नमो नमो मोर्चा (भारत) सातारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *