देवमाणूस पदरचे करोडो रूपये खर्च करून, *आमदार महेश शिंदे* *महामारीच्या छाताडावर उभारलेत*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आध्यात्माचा वारसा, कित्येक वर्षे पाश्चिमात्य देशांत राहून केलेला व्यवसाय यामुळे हे पेंडॅमिक काय आहे, काय आहे उपचाराचाप्रोटोकॉल, बेड शिवाय लोक तडफडून मरत आहेत अशावेळी नक्की काय गरज आहे, कोरोनाला घाबरायचे आहे की त्याच्याशी दोन हातकरण्यासाठी मैदानात उतरायचे आहे याची अत्यंत बारकाईने माहिती ज्ञान घेऊन महेश शिंदे यांनीकोरोनामुक्तीचा कोरेगावपॅटर्नशोधून काढला आहे. स्वतःच्या खिशातले करोडो रूपये खर्च करण्यासोबतच कोविड हॉस्पिटलमध्ये स्वतः सेवा देणारे हे महाराष्ट्रातीलचकाय देशातील एकमेव आमदार ठरले आहेत. कोणत्याही पीपीई किटशिवाय फक्त मास्क घालत दवाखान्यात जाऊन कोरोनाबाधितालाकुरूवाळत धिर देणारा हा केवळ लोकप्रतिनिधी नव्हे साक्षात देव असल्याचे आवाज दवाखान्याच्या खिडकीतून ऐकू येताहेत. एकटेचनव्हे तर कोरोनामुक्तांची एक फळी निर्माण करून कोरेगावकरांनी जणू जंग छेडली आहे.

त्याचाच हा आखोंदेखा हाल, कोणत्याही जाहिरात किंवा ऍडव्होरोटीयल शिवाय….!

*राज्याला नव्हे देशाला दिशा देणारा पॅटर्न*

पश्चिम महाराष्ट्र हा सध्या जगाचा हॉटस्पॉट बनला आहे. सगळय़ा यंत्रणा, शासन, प्रशासन कोलपडून पडले असताना कोरेगावचेआमदार महेश शिंदे यांनी निर्माण केलेला कोरेगावपॅटर्न देशाला दिशा देणारा आहे. कोणताही राजकारणी निवडणूकांमध्ये पैसा खर्चकरताना साऱयांनी पाहिला आहे, मात्र कोणतीही निवडणूक नसताना केवळ महामारीपासून माझ्या लोकांना वाचवण्यासाठी अक्षरशःपाण्यासारखा पैसा ओतणारा माणूस फक्त इथंच पहायला मिळेल.

वास्तविक, कोरोना अजून कोणालाच कळलेला नाही अगदी डव्लुएचओला सुद्धा कळलेला नाही. मात्र या महामारीपासून लोकांनावाचवण्यासाठी नक्की काय करायला हवं यासाठी अंतरराष्ट्रीय नॉर्मस् ठेवून आमदार शिंदे यांनी स्वखर्चाने कोरेगावात कोरोना केअरसेंटर कोविड हॉस्पिटलची निर्मीती केली आहे. महाराष्ट्रातच काय देशात कोण्या राजकारण्याला जमले नाही, ना कोण्या उद्योगपतीनेकेलेले नाही ते सगळं कोरेगावात पहायला मिळत आहे.

केवळ खिशात पैसे आहेत म्हणून ते मतदारसंघातल्या तरूणांना धाब्यावर पाटर्य़ांना खर्च करणारे राजकारणी पाहिले असतील पणरूग्णाला खांद्यावर घेऊन जाणारे आमदार हे एकमेव आहेत.

ऐन महामारीच्या काळात मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असेल तर देवानेच माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे,’ इतक्यासहजतेने त्यांनी प्रतिक्रिया दिली.

पहाटे अंडी शिजवण्यापासून ते मध्यरात्री रेमडिसिविरचे इंजेक्शन मिळवण्यापर्यंतची सारी ही लोकचळवळ असल्यासारखी होत आहेत. स्वतः महेश शिंदे केवळ मास्क लावून हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत त्यापुढे जाऊन आपल्या गाडीतून जणू ऍम्ब्युलन्स असल्यासारखंरूग्णाला घेऊन येत आहेत. सारं जग लॉकडाऊनमध्ये घरबंद असताना कोरेगावात मात्र रूग्ण शोधून शोधून त्यावर उपचार सुरू आहेत, तेही एका पैशाच्या खर्चाशिवाय. कोरोनामुक्त झालेले शेकडो कार्यकर्ते या लढाईत महेश शिंदेंच्या खाद्याखादा लावून उभे आहेत. जणूकोरेगावआर्मीनं हा लढा आपल्या खांद्यावर घेऊन छाताडावर पाय रोवण्याचा विडा उचललाय.

*आमदार महेश शिंदे थेट दवाखान्यात जाऊन रूग्णांना कुरूवाळतात तेंव्हा….*

खरंतर हॉस्पिटलच्या परिसरात जायला लोक घाबरत आहेत तिथे आमदार महेश शिंदे हे केवळ मास्क घालुन रूग्णांना कुरवाळतात नातेंव्हा अन्य कोणत्या मानसिक इलाजाची रूग्णाला गरज पडत नाही. आमदार लोकांना घास भरवतात, त्यांच्यासोबत व्यायामयोगाकरतात. जेंव्हा एखाद्या आज्जीबाई डॉक्टरांचे ऐकत नाहीत तिथं आमदारांच्या एका शब्दावर आज्जीबाई श्वसनाचे व्यायाम करूलागतात, हे आम्ही डोळय़ांनी पाहिलं आहे. आमदारांच्याशिवाय त्यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे, बहिणी डॉ. अरूणा विजय बर्गे, सातारा डॉ. मंजुषा संजय देशमुख, पंढरपूर यासुद्धा शिफ्टमध्ये काम करतात. डॉ. अरूणाताई तर रात्री 2/3 वाजेपर्यंत दवाखान्यात काम करतअसतात. याशिवाय राहुल बर्गे, किरण काटकर, संदिप फणसे, वसिम इनामदार, राजू महामुलकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनीआमदारांसाठी फुलटाईम डय़ुटी स्विकारली आहे. उज्वला निकम, साधना बर्गे यांनी कित्येक दिवसांपासून स्वतः रूग्णांच्या स्वयंपाकातगुंतवून घेतलं आहे.

*आता महिन्याला येणार 35 लाखांचा खर्च*

ज्याला दानत आहे, त्याला हिशोब म्हणत नाहीत. कोटय़ावधी खर्चुन हॉस्पिटल सेंटर्स उभारली गेली. आता डॉक्टर्स, स्टाफ यांचे पगार, रूग्णांचे जेवणनाष्टा, औषधे, गोळय़ाइंजेक्शन असा सगळा मिळून प्रत्येक महिन्याला साधारणतः 35 लाखांचा खर्च येणार आहे. कोरेगावात या लढय़ाला सुरूवात करताना आमदार महेश शिंदे यांना हा खर्च माहित होताच. हे शिवधनुष्य उचलणारे ते शिवसेनेतीलचनव्हे तर अन्य कोणत्याही पक्षातले एकमेव आहे. वाट्टेल तो खर्च आला तरी आता माघार नाही,

*कोरोनामुक्तांची आख्खी पलटण तय्यार आहे*

आमदार महेश शिंदे स्वतः कोरोनामुक्त आहेत पण त्यांनी मुक्त झालेल्या लोंकांची एक आर्मीच बनवली असून ती शिफ्ट लावूनस्वयंस्फुर्तीने काम करत आहेत. स्वतः आमदार 8 तासाची शिफ्ट करतात. याकाळात जेवण असो कि चहा जे काय करायचे तेहॉस्पिटलमध्येचत्यामुळे मुक्त झालेल्यांची आख्खी पलटण इथं सज्ज आहे. केवळ मास्क लावला की रूग्णाचे कोणतेही कामकरायला ते तयार असतात. अगदी आत हॉस्पिटलात जाऊन. अंथरूण, पांघरूण घालण्यापर्यत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *