जिल्हा सातारा तालुका माण मध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनांचे तीन-तेरा
मुख्यमंत्री लक्ष देणार काय? माण तालुक्यातील प्रशासनावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संजय भोसले यांची मागणी
माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी योजना मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेचे हीत लक्षात घेता अतिशय विचारपूर्वक ही योजना निर्माण केली होती या योजनेची व्याप्ती एवढी मोठी होती की सामान्य आणि गोरगरीब जनतेला एकदा नव्हे तर दोनदा त्याच्या दारापर्यंत येऊन शासनाच्या प्रतिनिधी कोरना आजाराची माहिती आणि ऍक्टमीटर तपासणी तापमान घेऊन गावागावातील कोरोना परिस्थितीवर तंतोतंत माहिती घेणार येणार आहेत या योजनेमध्ये कोरोणावरती मात करण्यासाठी अतिशय मोठी मदत महाराष्ट्र सरकारला होणार आहे तसेच गोरगरीब जनतेला सुद्धा या योजनेच्या माध्यमातून लोकांचे जीव वाचवण्यासाठी मदत होणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुरू केलेल्या या योजनेचा इतर तालुक्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामाचा सपाटा सुरू असून मान तालुक्यामध्ये गेले दहा पंधरा दिवस झाले या योजनेची माहिती देऊन अधिकारी केली परंतु या योजनेचे अध्यप अंमलबजावणी झाली नाही मिळालेल्या माहितीनुसार माण तालुक्यातील जिल्हा यंत्रणेला फक्त कागदोपत्री आकडेवारी पाठवण्यात आले आहेत ही सर्वसामान्य जनतेची फसवणूक आहे आरोग्य खात्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आशा वर्कर्स अंगणवाडी सेविकेची कारण पुढे करत असून अनेक भागात सर्वे सुरू झाला नसल्याची माहिती दिली मग असा प्रश्न पडतो की तालुका जिल्हा यंत्रणा केलेली आकडेवारी खरी की खोटी मान तालुक्यातून जिल्हा प्रशासनाकडे दिलेली आकडेवारी ही जर खोटी असेल तर या योजनेचा बट्ट्याबोळ करणारे अधिकारी कोण याला जबाबदार कोण माण तालुक्यातील जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वरती सरकारचा अंकुश राहिला नाही असे स्पष्ट मत सातारा जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले
उपविभागीय अधिकारी तहसिलदार आणि गट विकास अधिकारी इतक्या मोठ्या राज्यसरकारच्या योजनेकडे कानाडोळा करून जनतेची फसवणूक करत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात माण तालुक्यामध्ये आरोग्याच्या योजना जर सक्रिय झाल्या नाहीत तर जनतेतून उठाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही मत शिवसेना जिल्हा उपप्रमुख संजय भोसले यांनी व्यक्त केले.












Leave a Reply