मराठा आक्रमक …मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्थरिय बैठक जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मराठा आक्रमक ….मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक जाहीर

मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य यांची राज्यस्तरीय बैठक नाशिक येथे शनिवार दिनांक २६/०९/२०२० रोजी सकाळी १०;०० वा घेण्याचे नियोजन मराठा क्रांती मोर्चा च्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये झालेल्या बैठकीतही जाहीर करण्यात आले.राज्यात मराठा आरक्षणाच्या स्थगिती नंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असताना आत मराठा समाज शांत राहण्याच्या मानसिकतेत दिसून येत नाही अश्या वेळी राज्य सरकार मराठा समाजाला काही योजना जाहीर करत आहे परंतु मराठा या योजनांवर अजिबात अनुकूल नसून मराठा आरक्षण हीच एकमेव मागणी आज मराठा समाज सरकार समोर ठेवत आहे सरकार वर मराठा समाजाचा विश्वास राहिलेला नाही असे थेट आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक करत आहेत.या पुढे मराठा आरक्षणाची आणि आंदोलनाची भूमिका काय असणार आहे या विषय वर नाशिक येथे बैठक घेण्याचे नियोजन केले असून सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकानी नाशिक येथे हजर राहावे असे अहवान करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *