रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लाईव्ह महाराष्ट्र 24 । मुंबई ।

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांनी जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. असं असलं तरी विशेष एनडीपीएस कोर्टाने तिच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात आरोपी असलेले सुशांतचे मदतनीस सॅम्युएल मिरांडा व दीपेश सावंत यांच्यासह कथित अमलीपदार्थ विक्रेता अब्देल बसित परिहार या तिघांचा तुरुंगातील मुक्काम २९ सप्टेंबरपर्यंत वाढण्याची चिन्हे आहेत. कारण ‘अमलीपदार्थांची तस्करी व पुरवठा ही अत्यंत गंभीर समस्या असून यात कोणताही आदेश दिला तर तो अनेक प्रकरणांवर परिणाम करणारा ठरणारा असेल. त्यामुळं यातील महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यांविषयी केंद्र सरकार व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आपले उत्तर दाखल करायला हवे’, असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवून आणि तसे निर्देश देऊन उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २९ सप्टेंबरला ठेवली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *