जमावबंदी मराठा समाजासाठी आहे काय? राजकीय प्रवेशासाठी गर्दी कशी! मराठा समाज आपल्या हक्का साठी आंदोलन करणार महेश राणे आक्रमक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुंबई: आज मुंबई मध्ये जमावबंदी असतानाही कृष्णकुंजबाहेर गर्दी पाहायला मिळाली अनेक कार्यकर्ते नी मनसेत प्रवेश केला परंतु मराठा कार्यकर्ते आपल्या न्याय हक्का साठी शांततेत मार्गाने आंदोलन करत आहेत तर त्याना नोटीस पाठवली जाते तसेच १४४ कलम लावून मराठा समाजाचा एक प्रकारे आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे लक्षात येत आहे सरकार मराठा समाजाला न्याय देण्यात असमर्थ असताना नोकर भर्ती च्या जाहिराती काढून आणखी अन्याय करत आहे परंतु मराठा समाज कायद्याची अंमलबजावणी करून सरकार विरोधात आंदोलन करेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश राणे यांनी आज दिला.

मात्र,सध्या शिवसैनिकांच्या या मनसे प्रवेशापेक्षा त्यांनी केलेल्या नियमाच्या उल्लंघनाचीच जास्त चर्चा रंगली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून जमावंबदीचे कलम लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास तसेच एका ठिकाणी चारपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, सध्या मनसेप्रवेशासाठी उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली आहे. याठिकाणी सर्वजण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करता दाटीवाटीने उभे आहेत. त्यामुळे आता कृष्णकुंजबाहेर जमलेल्या गर्दीवर पोलीस कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *