सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असून आज मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनि मंत्रिमंडळ उपसमिती चे अध्यक्ष मा. अशोक चव्हाण यांची भेट घेतली व मराठा आरक्षण राज्यात कायम राहण्यासाठी कायदेशीर बाबीची पूर्तता करावी अशी आक्रमक मागणी केली. त्या वेळी अशोक चव्हाण यांनी ” न्यायलायाचा निर्माण हा धक्का देणारा आहेच परंतु मराठा आरक्षणा साठी जे काही कायदेशीर करता येईल या साठी सर्व कायदेतज्ज्ञ चे मत आम्ही घेत आहोत त्याच बरोबर नोकर भर्ती आणि शिकणामध्ये जी स्थगिती देण्यात आली आहे त्या साठी सोमवारी आम्ही न्यायालयात राज्यसरकार च्या वतीने अर्ज करत आहोत” तसेच आजच मुख्यमंत्री आणि उपसमिती यांच्या बरोबर आज याच विषयावर तत्काळ बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहे असे मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले यावेळी लाखे पाटील महेश राणे ,युवराज सूर्यवंशी, गणेश काटकर,विवेक सावंत,कायदेशीर सल्लागार ऍड राजेश टेकाळे ,ऍड दुभे यांनी अशोक चव्हाण यांच्या पुढे आक्रमक भूमिका मांडली.
मराठा सेवकांना अशोक चव्हाण म्हणाले….













Leave a Reply