जिल्हा प्रशासनाला वडूथ आणि वाढे नदीवरील पूल पडल्यावर बहुतेक जाग येणार ….मदन साबळे
सातारा ते लोणंद या रस्त्यावरील वडूथ व वाढे गावाच्या परिसराची प्रचंड दुरावस्था झाली आहे.याची तात्काळ दखल घेऊन या वरील अवजड वाहतुक बंद करणे रस्त्याचे काम उत्तम केले जावे.कष्णा नदीवर १७६ वर्षापुर्वीचा वास्तुशास्त्रातील अलौकीक असा दगडी पुल आहे..त्यावर पडलेले मोठ मोठे खड्डे ,वाढलेली झाडांमुळे या पुलाच्या अस्थित्वाला धोका निर्माण झाला अआहे.सदर पुलाची पून्हा दुरावस्था होऊ नये,उत्तम काम करण्यात यावे.
तसेच या पुलालगत सरंक्षक भिंत नसल्याने पुलाच्या अस्थित्वाला धोका निर्माण झाला आहे .याची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य असा संरक्षक भिंती बांधण्यात यावा.
यापुर्वी ही वडूथ व वाढे ग्रामस्थांकडून निवेदन देऊन त्याची आपल्या विभागाने दखल घेतलेली नाही.या निवेदनाची योग्य ती दखल घेऊन पुल आणि रस्त्याची गुणवत्ता पुर्ण कामे करण्यात यावी.
अन्यथा कामे होई पर्यंत ग्रामस्थ रास्ता रोको करतील.
यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास यास आपला विभाग सर्वस्वी जबाबदार राहिल.तरी योग्य ती कार्यवाही करावी,ही विनंती.
वारंवार आपणास संपर्क करून ही अंमलबजावणी झाली नाही मोठ मोठ्या खड्यातून सामान्य माणसं पडतायत कलेक्टर व नॅशनल हायवेचे आधिकारी चारचाकीत फिरतात त्यां मुळे त्यांना आमच्या अडचणी दिसत नाहीत यापुढे निवेदन देणार नाही रास्ता रोको होणार काय कार्यवाही करायची असेल ती आपण खुशाल करावी
मदन साबळे
जिल्हासचिव: भाजपा युवा मोर्चा सातारा












Leave a Reply