जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष सातारा लोणंद हा आता खड्ड्याच्या साम्राज्य असलेला मार्ग या मुळे नागरिकांचा जीवीतास धोका

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक मार्गावरती खड्ड्यांची मालिका सुरू असून त्याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले नाही तर आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. सामान्य माणसाला तसेच प्रत्येक वाहनधारकाला मार्गावरून प्रवास करावा लागतो त्यावेळी सकाळी कामावरती जातो संध्याकाळी आपल्या घरी येतो परंतु आज या खड्ड्यांच्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आपल्या घरातून गेलेला माणूस पुन्हा घरी माघारी येईल की नाही याची शाश्वती देता येत नाही याचं बहुतांश वेळेला मार्गातील खड्डे व अवजड वाहतूक हे दोन्ही ठरते आणि याचे उत्तम उदाहरण म्हणून सातारा लोणंद महामार्ग 965 डी हा आहे.

याचे कारण या मार्गावरती खड्ड्याच्या साम्राज्य झाले आहे तसेच यामध्ये वाढे येथील वेण्णा नदीवरील पूल व वडूथ-आरळे गावाला जोडणारा कृष्णा नदीवरील पूल हे प्रामुख्याने येतात. यामध्ये वाडूथ वाढे येथील पुलावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे येथून वाहतुकीस खूप मोठ्या प्रमाणात अडथळा येतो आहे मोठे अपघात या ठिकाणी घडतात. लहान गाड्या-मोठ्या गाड्या असू द्या. टायर फुटीचे प्रमाण या ठिकाणी घडल्याचे पाहायला मिळतोय याला जबाबदर जिल्हा प्रशासनाचं . यासाठी वेळोवेळी वाढे पासून अगदी लोणंद पर्यंत सर्व गावकरी या मार्गावरील जड वाहतूकीमुळे होणारे अपघात, ट्राफिक जाम यामुळे त्रस्त आहेत. या मार्गावरील जड वाहतूक बंद व्हावी यासाठी वेळोवेळी सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे पाठपुरावा करत आसतात परंतू प्रशासन मात्र ढिम्मच आहे .

यामुळे आता मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रशासन, अधिकारी यांना वैतागून शेवटी या भागातील सर्व ग्रामस्थांनी आता प्रशासनाला कोणतेही निवेदन, पत्रव्यवहार न करता कोणत्याही दिवशी अचानकपणे या मार्गावरती चक्का जाम आंदोलन करण्याचे ठरले आहे.
त्यामुळे आता प्रशासनाची कोणतीही बाजू ऐकण्याच्या मनःस्थितीत आता कोणाची ही नाही.

चौकट

सातारा ते लोणंद या रस्त्यावरील वडूथ व वाढे गावाच्या परिसराची प्रचंड दुरावस्था झाली आहे.याची तात्काळ दखल घेऊन या वरील अवजड वाहतुक बंद करावी रस्त्याचे काम उत्तम केले जावे.कष्णा नदीवर १७६ वर्षापुर्वीचा वास्तुशास्त्रातील अलौकीक असा दगडी पुल आहे..त्यावर पडलेले मोठ मोठे खड्डे ,वाढलेली झाडांमुळे या पुलाच्या अस्थित्वाला धोका निर्माण झाला आहे वडूथ वाढे परिसरातील रस्ते,कष्णा नदीवरील पुलाना संरक्षक भिंती उभारणे गरजेचे आहे

 

प्रशासनाची वाट न बघता घेतलेला आमचा निर्णय कीती तरी लोकांचे प्राण वाचवु शकतो

वारंवार आपणास संपर्क करून ही अंमलबजावणी झाली नाही मोठ मोठ्या खड्यातून सामान्य माणसं पडतायत कलेक्टर व नॅशनल हायवेचे आधिकारी चारचाकीत फिरतात त्यां मुळे त्यांना आमच्या अडचणी दिसत नाहीत यापुढे निवेदन देणार नाही रास्ता रोको होणार काय कार्यवाही करायची असेल ती आपण खुशाल करावी

मदन भिमाजी साबळे
उदयनराजे मित्र समूहाचे वडुथ भाजपा जिल्हा युवा मोर्चा सातारा जिल्हा सचिव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *