पहिला सण – बेंदूर
आपल्या कृषीप्रधान भारत देशात बैलांना फार
महत्व आहे. पोळा हा बैलांचा सण आहे. बैल
म्हणजे
श्रम म्हणजेच कष्ट. अशा कष्ट
करणाऱ्याची पूजा म्हणजेच जो दुसऱ्यासाठी श्रम
घेतो अशा श्रमदेवतेची पूजा करण्याचा हा दिवस
होय. या दिवशी फक्त बैलांचीच नव्हे तर
शेतीसाठी लागणाऱ्या नांगर, विळी, कोयता,
खोर इत्यादी साधनांचीदेखील
पूजा केली जाते. सजीवाबरोबर
निर्जीवामध्येदेखील ईश्वर बघण्याची,
त्याची पूजा करण्याची आपल्या संस्कृतीची परंपरा आगळीच
म्हणावी लागेल.
‘शेतकऱ्याचा बैल
आणि गरिबाची बायको आजारी पडू नये’
अशी एक ग्रामीण म्हण आहे. यावरूनच
शेतकऱ्यासाठी बैल किती महत्वाचा व
अनिवार्य आहे हे समजेल. बैलाचे
शेतकऱ्यावरती अनंत
उपकार असतात व हे तो आयुष्यभर फेडू शकत
नाही म्हणून कृतज्ञता व्यक्त
करण्यासाठी पोळा अत्यंत आत्मियतेने
साजरा केला जातो.
आपला बैल हा प्रत्येक शेतकऱ्याचा अभिमान
असतो. आपल्या सख्या भावाप्रमाणे बैलावर
प्रेम
केले जाते.
गावाच्या वेशीवर मारुतीचे मंदीर असते.
मारुती हे बुद्धी वं चपळतेचे दैवत असल्याने हे
दोन्ही गुण आपल्या बैलात यावेत,
त्यांना कोणाचीही दुष्ट बाधा होवू नये म्हणून
बैलांना देवळात नेण्याची प्रथा आहे.
आपल्या उपकारकर्त्याला इतक्या पूज्य भावाने,
कृतज्ञतेने, उत्साहाने मिरवायची, गावात
फिरवायची प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते.
ह्या दिवसाची बैलाबरोबर शेतकरीही आनंदाने
वाट बघत असतो.
सर्वांना बेंदुरच्या हार्दिक शुभेछ्या
मदन भिमाजी साबळे (वडूथ)
जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चा सातारा












Leave a Reply