वडूथ येथे भव्य असे शिवस्मारक साकारणार
सातारा
वडूथ (ता.सातारा) येथे छ.शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरु झाले असून परिसरातील शिवप्रेमींकडून, नागरीकांकडूनसमाधान व्यक्त होत आहे. कोरेगाव विधानसभेचे आमदार तथा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे यांनी त्यांच्याफंडातून २० लक्ष रुपये मंजूर केले आहेत. यामधून हे काम होणार आहे. अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळेयांनी दिली.
या बद्दल माहिती देताना साबळे पुढे म्हणाले या शिवस्मारकाच्या हकामासाठी ना.महेश शिंदे यांनी निधी मंजुर केला आहे. वडूथ येथीलमुख्य चौकाचे सुशोभीकरण होणार आहे यामध्ये सातारा येथील शिवतीर्थासारखे भव्य असे शिवस्मारक येथे साकारणार आहे. यामुळेभागातील सर्व शिवभक्तांची मागणी पूर्ण होणार आहे. बऱ्याच वर्षांपासून या शिवस्मारकाचे काम प्रलंबित होते. यासाठी गावकरी कायमलोकप्रतिनिधींकडे मागणी करत होते. वडूथ गाव बाजारपेठेचे गाव असल्यामुळे याला वेगळेच महत्त्व आहे. तसेच सातारा–लोणंदमार्गाला राज्यमार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे या मार्गावरील सोई सुविधामध्ये नक्कीच भर पडणार आहे.
या कामाची सुरुवात अजित साबळे, तालुका उपाध्यक्ष प्रदीप मोरे, आबासो दादा साबळे, बाळासो साबळे, गणेश मोरे, आकाश साबळे, महेश साबळे, किरण साबळे, मनोज साबळे माजी सरपंच किशोर शिंदे, उपसरपंच सुहास साबळे, पोलीस पाटील संदीप माने, राजेंद्रसाबळे, भानुदास साबळे तात्या यांच्या उपस्थित झाली.












Leave a Reply