मारुती साबळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वाई, ता. : येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकून मारुती गुलाब साबळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त तहसीलदार सोनालीमिटकरी यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. या वेळी नायब तहसीलदार वैशाली जायगुडेघोरपडे, आशा दुधे, भाऊसाहेबजगदाळे, सतीश पवार, वैशाली साबळे आदी उपस्थित होते.

श्रीमकी मिटकरी म्हणाल्या, “महसूल खात्यात नोकरी करताना अनेकदा मानसिक ताणतणाव निर्माण होत असतात. त्यावर आपल्याशांत आणि संयमी स्वभावाच्या बळावर आणि प्रामाणिकपणे सेवा केल्यास निश्चित मात करता येते याचा आदर्श अव्वल कारकूनमारुती साबळे यांनी घालून दिला आहे.”

या वेळी नायब तहसीलदार वैशाली जायगुडे, विश्वनाथ कांबळे, मनोज आगरकर, सुप्रिया गुंजवटे, मिथुन कांबळे, अशोक सपकाळ, दीपक

भुजबळ यांनी साबळे यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव कथन केले. पी. बी. शिर्के यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती आशा दुधे आभारमानले. कार्यक्रमास तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी, सेवक उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *