नवीन कायद्याची भुईज पोलीस स्टेशनमध्ये कार्यशाळा,

दिनांक ३०.०६.२०२४ (प्रतिनिधी)
नवीन कायद्याची भुईज पोलीस स्टेशनमध्ये कार्यशाळा, जिल्हयात पहिलाच उपक्रम
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम है।
तीन कायदे सन २०२३ मध्ये संमत झाले असून नवीन कायदयाची अंमलबारी १ जुलै २०२४
पासून देशामध्ये सुरु होत आहे. सध्या कार्यरत असलेले जुने कायदे फौजदारी प्रकरण
संहिता (सी.आर.पी.सी.) भारतीय दंड संहिता (आय.पी.सी.) व भारताचा पुरावा कायदा
(इव्हीडन्स अॅक्ट) याची कार्यवाही आत्तापर्यंत दाखल असलेल्या गुन्हयाची निर्गती होईपर्यंत त्या
गुन्हयापुरवीच अंमलात आहे. तसेच ज्या गुन्हयांच्या घटना, प्रकार हे ३० जूनपर्यंत घडलेले
आहेत त्या जुन्या घटनावरुन दाखल होणारे गुन्हे जुन्या कायदयातील तरतुदीप्रमाणे होणार
आहेत परंतु १ जुलै पासून घडणाऱ्या घटना, गुन्हे हे मात्र नवीन कायद्यातील तरतुदीप्रमाणे
दाखल होवून नवीन कायद्यातील तरतुदीप्रमाणे तपास केले जाणार आहेत.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) मध्ये ५३१, भारतीय न्याय संहिता
(बी.एन.एस.) मध्ये ३५८ व भारतीय साक्ष अधिनियम (बी.एस.ए.) मध्ये १७० कलमांचा
समावेश आहे. या तीन नवीन कायद्यामधील तरतुदी, दुरुस्ती यातील व्याख्या, झालेले बदल,
शिक्षांची तरतुद, तपासातील पारदर्शकता, तपास करताना घ्यावयाची दक्षता इत्यादि बाबींवर
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संभाजी पाटील व वसंत साबळे यांनी भुईंज पोलीस स्टेशनचे
अधिकारी व अंमलदार यांना दिली. सातारा जिल्हयामध्ये नवीन कायद्याची कार्यशाळा घेणारे
भुईंज है पहिले पोलीस स्टेशन ठरले आहे. कार्यशाळेनंतर पोलीस अंमलदार यांची नवीन
कायदयातील तरतुदी विषयी परीक्षा घेवून सपोनि रमेश गर्जे यांनी प्रथम तीन अंमलदार यांचा
सत्कार केला.
नवीन कायद्यातील तरतुदी, कार्यपध्दती, त्यातील सुधारणा याची प्रत्येक पोलीस
स्टेशनला अशा प्रकारची कार्यशाळा घेतल्यास सातारा जिल्हयातील प्रत्येक पोलीस अंमलदार
यांच्यापर्यंत नवीन कायद्यातील सुधारणा, कार्यपध्दतीच्या ज्ञानात भर पडणार आहे. व त्याचा
गुन्हेगारांवर वचक राहून गुन्हयास प्रतिबंध बसू शकतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *