शेतकऱ्यांची ऊस बिले तत्काळ अदा करा ; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा रयत क्रांती संघटनेचा इशारा
सातारा : जिल्ह्यात एफ आर पी कायदा पायदळी तुडवन्यात येत असून शेतकऱ्यांना दोन महिने उलटून ही अद्याप बिले मिळत नाहीत. कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले तत्काळ अदा करावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी, कारखाने प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांच्या झालेल्या बैठकीत ऊस बिले १४ दिवसात देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र अनेक कारखान्यांनी दोन महिने उलटून ही अद्याप बिले दिलेली नाहीत. एकूणच कायदा फाट्यावर मारण्याचे काम कारखानदार करत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ह्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा बैठक घेवून बिले अदा करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा शेतकरी संघटना आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन पुकरणार असल्याचे प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी सांगितले आहे.












Leave a Reply