मुंबई : भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत आहे. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाही. तसेच आज विरोधक सकाळी आरोप करत होते की काही ठिकाणी अजिबात सरकारचे लक्ष नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष आहे. देशाचे पंतप्रधान दिल्लीत बसूनच निर्णय घेतात, व्हीसी घेतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानातून निर्णय घेतात, बिघडले काय, असा थेट प्रश्न विरोधकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. विधानपरिषदेत आज अजित पवार पुरवणी मागण्यांवर उत्तर दिले तेव्हा विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
पंतप्रधान दिल्लीत बसूनच निर्णय घेतात, मुख्यमंत्री वर्षावर बसून निर्णय घेतात, अजित पवार













Leave a Reply