*शकुंतलेश्वर मंदिर वडूथ येथे शानदार दीपोत्सव २०२३ दिमाखात साजरा*


*शकुंतलेश्वर मंदिर वडूथ येथे शानदार दीपोत्सव २०२३ दिमाखात साजरा*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा विशेष प्रतिनिधी

सालाबादप्रमाणे दीपावली पाडव्याला नियमितपणे अखंडित साजरा २०१२ पासून  दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर  वडूथ, सातारा येथीलयंदाचा दीपोत्सव येथील ग्रामस्थांनी दिमाखात साजरा केला.

यावेळी हाजारो पणत्यांचे संकलन ग्रामस्थांनी केले. रात्रीच्या अंधारात या पणत्यांच्या प्रकाशाने शकुंतलेश्वर मंदिर परिसर लख्खप्रकाशाने उजळून गेला. या शानदार प्रकाशपर्वाचे हजारो वडूथवासिय साक्षिदार बनले. दिमाखदार सोहळ्याचा मनोमन आनंद लुटला.

वडूथ ता. जि. सातारा येथील कृष्णाकाठी असलेले श्री शकुंतलेश्वर मंदिरसातारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असणारे गाव वडूथ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमितील ऐतिहासिक पार्श्वभूमि असलेल्या या श्री शिवशंकराच्यामंदिराकडे दरवर्षी श्रावण मासात भावीकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. निसर्गरम्य वातावरणात कृष्णेच्या तिरावर बांधलेल्याया मंदिरासमोरून खळाळून वाहणारी कृष्णा नदी, त्याचप्रमाणे कृष्णेच्या तिरावर सुंदर दडगी रेखीव शकुंतलेश्वराचे मंदिर. अशानयनरम्य, निसर्गसंपन्न वातावरणात असलेल्या या मंदिराची अख्यायिका अशी

तिसरा पेशवा बाळाजी बाजीराव पुण्याहून सातारा येथे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे मानाची पेशवाईची वस्त्रे सन्मानपूर्वकनेण्यासाठी वडूथमार्गे सातार्‍याला जात असताना वडूथ येथे त्यांचा मुक्काम होता. एके दिवशी त्यांना कृष्णा काठावर सुप्रभाती शकूनघडला. त्यावरुन त्याच स्थळी त्यांनी २४ ते ३० मे १७५८ या सहा दिवसात शकुंतलेश्वर मंदिराची स्थापना केली. पिंडीचा  मुख्यगाभारा बांधून नंतर सातारा येथे वस्त्रे आणण्यास गेले. याच त्या शकुंतलेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभल्याने एक अनोखे महत्त्वप्राप्त झालेले आहे. हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणून देखील ओळखले जाते. असे नयनरम्य, विलोभनीय, निसर्गसंपन्नपरिसरात हे मंदिर उभारण्यात आले. आजही पुराचे पाणी कृष्णा नदीमध्ये आले तर त्या ठिकाणी त्या मंदिराला पाण्याचा पूर्ण वेडापडतो. काही काही वेळा असा प्रसंग येतो की पेशवेकालीन असलेले हे मंदिर पूर्ण पाण्याखाली जाण्याचा अनुभव ग्रामस्थ पंचक्रोशीकरांना मिळतो.

शकुंतलेश्वर मंदिराला जसे ऐतिहासिक महत्त्व आहे तसेच पौराणिक महत्त्वदेखील आहे. फार वर्षापूर्वी इंद्रदेव गिधाड रूपाने निचुलऋषींची परीक्षा घेण्यासाठी कृष्णाकाठी आले असता त्यांनी ऋषींना नरमांस देण्याची भिक्षा मागितली. ऋषींनी आपल्या मुलांनासांगितले की, भगवंताचा स्वर्ग मोक्ष प्राप्त होणारा आनंद आहे. तुम्ही तुमचे मांस या गिधाडाला द्या. यावर आम्ही मांस देणार नाही, असेउलट उत्तर मुलांनी ऋषींना दिले. त्यामुळे ऋषींनी मुलांना शाप दिला. मात्र गिधाडाला ऋषींनी स्वतःचे मांस देण्याची तयारी दर्शविली. तेव्हा इंद्रदेवाने गिधाडाचे रुप बदलून स्वरूप प्रकट केले ऋषींना म्हणाले आपण फार उदार आहात मी आपली परीक्षा पाहिली. मीइंद्रदेव आहे. त्यावर ऋषी रागावले त्यांनी इंद्रदेवाला शाप दिला की तुम्ही येथे हजारो वर्षे शकुंत पक्षी होऊन राहावे. जेव्हा तुम्हालाअगस्ती ऋषी भेटतील तेव्हा तुमची मुक्तता होईल. पुढे कालांतराने त्यांना अगस्ती ऋषी भेटले. म्हणाले या ठिकाणी कृष्ण तीर्थ म्हणूननावारुपास येईल. आपण तपश्चर्या केल्यामुळे त्यांना प्रसन्न होऊन वर दिला की, आपण शाकुंतेश नावाने राहून तुम्ही या ठिकाणीअक्षय्य वास्तव्य करून राहावे. तेव्हापासून हे तीर्थ परम पवित्र जागृत दैवत बनले आहे

. पुढे पेशव्यांनी या ठिकाणी मंदिर स्थापन करुन या ठिकाणाला शकुंतलेश्वर हा नावलौकि मिळाला.

त्याचप्रमाणे पंचक्रोशीत कुठेही नसणारे श्री विष्णूचे मंदिर वडूथ गावात आहे. तसेच श्रीरामाचे मंदिर आहे. बानेश्वर म्हणून श्री शंकराचेमंदिर आहे तर मारुती   श्री गुरुदत्त नागदेव तसेच सटवाई देवी चिलुबाई देवी   लक्ष्मी आई म्हसोबा , सावतामाळी बोधलेमहराज मंदिरदेखील आहे. वडूथ गावचे ग्रामदैवत श्री म्हातोबाचेदेखील या गावात मंदिर आहे. थोडक्यात ऐतिहासिक मंदिरांचे गावम्हणूनही वडूथ गावाची ओळख बनली आहे.

जेव्हापासून सातारा शहराची निर्मिती झाली तेव्हापासून वडूथ गावची बाजारपेठ आहे. वडूथ गावामध्ये आजूबाजूच्या गावातीलग्रामस्थांची वर्दळ होत असते. बाजारासाठी ग्रामस्थ नियमित येजा करतात. या गावात अनेक सुखसोयी आहेत. जसा काळ उलटलातशा गावातील सुखसोयीदेखील वाढत गेल्या. शकुंतलेश्वर मंदिरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. गावातील तरुणतरुणी तसेच ग्रामस्थ अतिशय उत्स्फूर्तपणे या कायक्रमांत मोठ्या उत्सवाप्रमाणे सहभागी होतात. दिवाळीत प्रत्येकाच्या घरात दिवाअसतो मात्र यावेळी मंदिरात ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. वडूथ येथीलश्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र मंडळ यांच्या संकल्पनेतून २०१२ सालापासून दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू करण्यातआली. ही परंपरा अखंडीत ठेवण्याचाही मानस आहे. पुढील पिढीनेही यामध्ये खंड पाडता दरवर्षी आनंदाने दीपोत्सव साजरा करावाअसा मनोदय वडूथ करांचा आहे.

या दीपोत्सव ला साबळे प्रोव्हिजन यांचा कडून या वेळी हजारो दिवे  दीपोत्सव साठी दिल्या

यामुळे तेव्हापासून प्रत्येक वडूथवासिय प्रकाशवाटेने आपला प्रवास करत आहे, असे मानन्यास हरकत नाही. तर कित्येकांचे जीवनचप्रकाशमय झाले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *