चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना वडूथ गावात बंदी….
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी झगडणाऱ्या जरांगे पाटील नावाच वादळ आज सातारा जिल्ह्यातील वडूथ ता. सातारा गावात धडकल असून ते वादळ 2/3 दिवसात जिल्ह्यातील प्रेत्यक गावात पोहचणार..
वडूथ 5 हजार लोकसंख्येच राजकीय दृष्ट्या संवेदशील असलेलं जिल्यातील बाजारपेठेच गाव. कोणतीही निवडणूक जाहीर झाली कि याच गावातून प्रचाराला सुरुवात होते. सर्व राजकीय पक्षीय नेत्यांच या गावावर विशेष लक्ष असतं. परंतु या गावानं मात्र आता नेत्यांवरच लक्ष ठेवलं आहे. गावातील मराठा तरुण, सर्व सामान्य व्यक्ती यांनी मराठा समाजला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांना साथ देण्याची शपथ घेतली आहे. गावामध्ये काही बॅनर झळाकले असून त्यावर राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी, चुलीत गेले नेते आणि चुलीत गेला पक्ष मराठा आरक्षण एकच आमच लक्ष मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत आमदार, खासदार व कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यास गावात प्रवेश नाही. आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा. कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर लावू नयेत आगामी काळात होत असलेल्या सर्व निवडणुकावर बहिष्कार राहील. सकल मराठा समाज वडूथ अशा मजकूराचे फलक झळकाले आहेत. त्यामुळं विविध प्रसार मध्यमानी गावास भेटी देऊन गावातील तरुण, नागरिक यांच्याशी संवाद साधले. वडूथ गावतील बोर्ड 2 तासात जिल्ह्यात पोहचले असून अशा प्रकारच वातावरण संपूर्ण जिल्ह्यात पोहचण्यास वेळ लागणार नाही.











Leave a Reply