लोकराजा आमदार महेशदादा शिंदे
जेव्हा सामाजिक संकटात समाज उद्ध्वस्त होत असताना काही जण बघ्याची भूमिका घेतात, काही जण व्यवस्थेला दोष देतात तर कोणीतरी एखादा सामाजिक बांधिलकीतून ते संकट परतावून लावण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. संकटात ध्येयवादी व्यक्तीच्या मागे कुटुंब आणि समाज उभा राहिला हे आम्ही कोरेगाव तालुक्यात पाहिले. कोरोनाची धास्ती वाढलेली, उपचारासाठी बेड उपलब्ध होत नव्हते, अनेकांच्या आयुष्याचा दोर कमकुवत होत असताना रक्तातील माणसं सुध्दा काही करु शकत नव्हती. अशा सैरभैर करणाऱ्या परिस्थितीत कोरेगावचे आमदार महेशदादा शिंदे यांनी स्वखर्चातून भारतात पहिले सुसज्ज कोविड सेंटर उभे केले. आणि काय चमत्कार माहित नाही. पण त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाने या सेंटरमध्ये अहोरात्र सेवा देत प्रत्येक रुग्णाला आपले मानत मोफत उपचार देऊन बरे करून घरी पाठवले. छत्रपती शाहू महाराजांना लोकराजा ही उपाधी दिली गेलीय. कारण लोकांचा असलेला लोकमान्य असा राजा म्हणजेच लोकराजा. अगदी याच पद्धतीने कोरेगाव मतदार संघाचे विद्यमान आमदार महेशजी शिंदेसाहेब हे लोकांसाठी जगणारे, लोकांनी आपलेपणाने, मनाने मानलेला राजा आहे. आज 8 ऑगस्ट महेशजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस त्या निमित्त त्यांचे मनःपूर्वक अभिष्टचिंतन…
हजारो रुग्णांना जीवदान देणाऱ्या शिंदे परिवाराच्या कर्तृत्वाची ख्याती सर्वदूर कौतुकास्पद पोहोचली. एका बाजूला उपचारासाठी लढा सुरू असताना दुसऱ्या बाजूला लॉकडाऊनमुळे उपाशीपोटी असणाऱ्यांना घरपोच पुरेसे अन्नधान्य वाटप करत मतदारसंघाचे पालकत्व स्वीकारलेला लोकप्रतिनिधी कोरेगाव मतदारसंघाने प्रथम पाहिला नाही तर अनुभवला. आपल्या नेत्यांच्या कार्याला निरपेक्ष भावनेने अनेकांनी अहोरात्र साथ देत उपचार व्यवस्था आणि अन्नधान्य वाटप कार्यात अतुलनीय योगदान दिले.
मतदारसंघातील खऱ्या कोरोनायोध्दा असणाऱ्या आशासेविका,आरोग्य सेविकांना शक्य ती मदत करून त्यांचे योग्य वेळी कौतुक आणि त्यांना प्रोत्साहन दिले.अनेकांना आर्थिक मदत करत जगण्याची उमेद वाढवली. गावागावात रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधांचे वाटप केले. तर सॅनिटायझर फवारणी करून रोग नियंत्रीत करण्यासाठी महत्वपूर्ण जबाबदारी सुध्दा याच आणीबाणीच्या काळात पार पाडली गेली. स्व. खर्चाने रुग्णवाहिका घेऊन गरजूंना उपचारापर्यंत विनामूल्य पोहचविण्यासाठी २४ तास अव्याहतपणे उपलब्ध करून दिली. ज्यांनी आपणास आमदार केले त्यांच्या ऋणात राहून त्यांची स्वखर्चाने सेवा करणारे देशातील एकमेव आमदार महेशदादा शिंदे आहेत. हे सारा हिंदुस्थान जाणतो आहे. बाकी शासनाच्या पैशांवर स्वतःची टिमकी वाजवणारे टिचभर काम करून हातभर गाजावाजा करणाऱ्या सगळ्यांची सगळ्यांना ओळख झाली आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी असते ती कामे करण्यात तर महेशदादा सर्वात आघाडीवर आहेत. मतदारसंघातील शिवार रस्ते, जनतेचे प्रश्न जागच्याजागी सोडवणारा हा लोकनेता आता प्रत्येकाला आपला वाटतो. कोणतेही काम असो ते गुणवत्तापूर्ण असणारच, त्यात चवली पावली सुध्दा कुणालाही मिळत नाही. कारण आतापर्यंत कामे झाली, ती पावसाळ्यात वाहून जात होती. त्याच त्याच कामावर लाखोंचा खर्च करून नेता, त्यांची पिल्लावळ आणि लबाड ठेकेदार मोठे झालेले सर्वांनी पाहिले आहे. आता कोणत्याही कामात वरकमाई दमडी मिळणार नाही. पण गुणवत्तेची हमी देणारी कामे याच कोरेगाव मतदारसंघात पाहिला मिळतात. हा सर्वांनी ओळखले आहे. कारण टीकाटिप्पणी करायला पण मुद्दा मिळत नाही, एवढी मतदारसंघातील विरोधकांची वाईट अवस्था झाली आहे.
सामाजिक, धार्मिक, राजकीय, अध्यात्मिक वारसा जोपासणारा आमदार प्रथमच कोरेगाव मतदारसंघाला मिळाल्याचा अभिमान अख्खा मतदारसंघाला वाटतो.
आमदार महेश दादा शिंदे हे पक्षीय राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात अधिक महत्त्व देतात. निस्वार्थी, निगर्वी, साधा आणि आपला माणूस वाटणारे महेशदादा शिंदे यांनी आमदार कसा असावा, याची जणू ओळख महाराष्ट्राला करून दिली आहे, असे म्हणणे सुध्दा योग्य ठरेल. आत्तापर्यंत आमदार म्हणून मिळणारे मासिक भत्ता सुध्दा लोककल्याणासाठी देणारा एकमेव नेता म्हणजे आमदार महेशदादा शिंदे असावेत.
कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या गावात जाऊन जनतेला आधार तर गरजूंना उपचारासाठी प्रयत्न करणाऱ्या महेशदादांना दोनदा कोरोना संसर्ग झाला.
काही जण नुसत्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेत जनतेला गाजर दाखवत फिरत आहेत. फक्त निवडणूकीत पैशाच्या जोरावर पुढाऱ्यांना नशेत ठेवणारे काही जण याच मतदारसंघाने पाहिले आहेत. आता खराखुरा लोकप्रतिनिधी कोरेगाव मतदारसंघाला मिळाला आहे. जनमानसाच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारे आमदार महेशदादा शिंदे हा नेता नसून लोकराजा असल्याचे लोक बोलू लागले आहेत. अशा या लोकराजाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.
तुमचा
मदन साबळे











Leave a Reply