चंद्रकांत पाटील यांचे सभापती रामराजे यांना पत्र

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 4 वर्षांपूर्वी रामराजे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती व्हावेत यासाठी राष्ट्रवादीला कधीही न केलेले मतदान भाजपाने केले होते. भाजपाचे सरकार असतानाही रामराजे यांनी भाजपाला कधीही सहकार्य केले नाही. मात्र सध्या रामराजे यांनी दुजाभावाचा आणि दबावाखाली काम करण्याचा कळस गाठला आहे, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली. कोरोनामध्ये उपसभापतीची निवडणूक? भाजपाचे तीन सदस्य कोव्हीडबाधित तरीही निवडणूक? सभागृहात 78 ऐवजी 60 सदस्य उपस्थित तरीही निवडणूक ? कोर्टात केस पेंडिंग, तरीही निवडणूक ? असे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी पत्रातून उपस्थित केले. एक निस्पृह व्यक्तिमत्त्व म्हणून रामराजे यांच्याबद्दल मनात असलेला आदर आज निश्चितच कमी झाला आहे, मात्र राजकारण आहे, हे चालतच राहणार, अशा शब्दात रामराजे यांच्याबद्दल असलेली खंत त्यांनी पत्रातून मांडली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *