कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा शिंदेसाहेबांनी आज केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग
मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेबांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी आमदार साहेबांनी गडकरी साहेबांबरोबर कोरेगाव मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली यामध्ये प्रामुख्याने
◆ सातारा ~ ~ लोणंद रस्त्यावरती वाढे येथे वेण्णा नदीवरील पूल
◆ वडूथ येथील कृष्णा नदीवरील पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असून त्याची सद्य स्थिती माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांना समजावून सांगितली. त्यांनी सदरचे पूल तातडीने बांधण्याचे आदेश दिले.
◆ तसेच कोरेगाव शहरातील वाहतुकीची समस्या तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षा या गोष्टी लक्षात घेऊन कोरेगाव शहराचा बायपास करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले.
माननीय नामदार गडकरी साहेब यांनी कोरेगावला बायपास करणार असे आश्वासित केले आणि संबंधितांना लगेच तसे निर्देश दिले .
आजची झालेली बैठक ही कोरेगाव मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून यामध्ये कोरेगाव मतदारसंघातील प्रमुख तीन प्रश्न मार्गी लागल्याने
आमदार महेशदादा शिंदेसाहेबांनी समाधान व्यक्त केले आहे











Leave a Reply