भारताला आधुनिक कृषी क्रांतीच स्वप्न दाखवणारा सातारा जिल्ह्याचा सुपुत्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आदरणीय खा श्री शरदचंद्रजी पवार साहेबांची पारख कधी चुकीची नसते हे आजपर्यंत आपण अनुभवल आहे पवार कुटुंबांला मिळालेला रत्नपारखी “हिरा” हो मी हिराच म्हणेल ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री निलेशजी नलवडे सर खरंतर आम्हाला माळेगाव मधील SSM हायस्कूल मध्ये शिकवणाऱ्या श्री बापू नलवडे सरांचा मुलगा ते पवार साहेबांच्या संस्थेच्या CEO पदाची जबाबदारी पार पाडणारा एक उच्चविद्यािभूषित परदेशात आपल शिक्षण पूर्ण करून थेट साहेबांच्या संस्थेत विराजमान झालेला एक अवलिया पद्मश्री आप्पासाहेब पवार यांनी सत्तरच्या दशकात लावलेल्या झाडाचं रूपांतर आज वटवृक्षात झालेले आपणास दिसत आहे..

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती या संस्थेचे नाव फक्त बारामती पुरतं किंवा महाराष्ट्रा पुरतं देशा पुरतं मर्यादित न राहता आज जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले आणि या बारामतीच्या कृषी पंढरीला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी जितकं आदरणीय पवार साहेब, अजित दादा, सौ,सुप्रिया ताई, संस्थेचे चेअरमन आदरणीय राजेंद्र दादा संस्थेच्या विश्वस्त म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ. सुनंदा वहिनी, रोहित दादा, रणजित आण्णा, व सर्व पवार कुटुंबियांनी योगदान दिले..

तितकच योगदान पडद्याच्या पाठीमागे राहुन पवारांचा एक शिलेदार रात्र न दिस काम करतोय खरंतर मी असं म्हणेन की आदरणीय पवार साहेबांचे कृषी आणि कृषी क्षेत्राशी निगडित असलेल प्रत्येक छोट मोठं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जिवाच्या आकांताने ही संस्था माझी आहे म्हणून काम करणारा साहेबांचा हा “हिरा” खरंतर प्रसिध्दी पायाशी लोळण घालत असताना देखील हा माणूस कधीच प्रसिद्धीच्या झोतात आला नाही..
तो आपल काम प्रामाणिक पणे करत राहिला, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असणारा हा माणूस सातारा जिल्ह्यातील वाडे फाटा या गावचा हा कर्तृत्ववान मुलगा म्हटलं तरी काय अतिशयोक्ती वाटणार नाही खरंतर तुम्हीं आम्ही फक्त आजचा विचार करतो पण हा माणूस पुढच्या ५० वर्षात शेती क्षेत्राला शिक्षण क्षेत्राला कशाची गरज आहे ते ओळखून कार्य करत आहे…

आणि याची प्रचिती आपणा सर्वांना आली आहे बारामतीच्या चहूबाजूला जर आपण पाहिलं तर एकीकडे कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून लाखो शेतकरी राजाला वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी केली पाहिजे याची प्रात्यक्षिक दाखवणारा,इंडोडच च्या धर्तीवर माती विना शेती कशी करायची याची प्रात्यक्षिक COE कृषिकच्या माध्यमातून भुरळ पाडणारा.. तसेच ब्राझीलच्या धर्तीवर शेतीला पूरक असा जोड व्यवसाय म्हणून आपण दूध व्यवसायाकडे पाहतो तो दूध व्यवसाय कमी गाई मधे जास्त दूध शेतकऱ्याला कस देता येईल अश्या गाई तयार करून त्याच संकरित बीज इथल्या गाईंना देवून शेतकऱ्याचा घरात सुख समृध्दी आणू पाहणारे राजेंद्र दादांच्या मार्गदर्शनाने सेंटर ऑफ एक्सलन्स या गाई गोट्याचा भव्यदिव्य प्रकल्प उभा करणारे सर..

तसेच इथल्या विद्यार्थांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावं म्हणून किंवा इथल्या नवं तरुणांना स्वतःच्या मनातल्या उद्योग व्यवसायाच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मागील काळात देशातील सर्वोच्च अस नीती आयोगाचं अटल इंकुब्युशन सेंटर उभे करणारे सर…
तसेच इथल्या विद्यार्थांनी शास्त्रात पारंगत व्हावं म्हणून विद्यार्थांनच्या मनातील नवं तंत्रज्ञान, नवं संकल्पना, जाग्या व्हाव्यात म्हणून देशातील सर्वोच्च अश्या राजीव गांधी सायन्स पार्क अँड इनोवेशन ची उभारणी आदरणीय साहेब आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाने उभे करणारे सर ,आपल्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्पर्धेमध्ये उतरावं म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव ज्याला आपण स्विमिंग टॅंक म्हणतो त्या स्विमिंग टॅंकची निर्मिती अलीकडच्या काळात या ठिकाणी करणारे सर…

खरतर सण २००९ च्या आसपास सरांनी संस्थेचे प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यानंतर संस्थेच्या प्रगतीचा आलेख सदैव उंच उंच रेखाटला गेला आणि हा रेखाटला जात असताना आणि इतर वेगवेगळे आणि भव्य दिव्य प्रकल्प आणत असताना खऱ्या अर्थाने संपूर्ण पवार कुटुंबियांनी आदरणीय सरांना दिलेल पाठबळ केलेलं सहकार्य आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आदरणीय सरांनी दाखवून दिलेला त्यांचा विकासाचा व्यापक दृष्टिकोन किती मोठा आहे हे या निमित्ताने समजत..
खरंतर ही संस्था फक्त पवारांपुरती मर्यादित नाहीये तर या संस्थेच्या जीवावरती आज हजारो लोकांना रोजगार मिळतो आणि हा रोजगार मिळाल्यामुळे कित्येकांचा आर्थिक जीवनमान उंचावलं गेलंय हे देखील सत्य आहे..
दहा वर्षाच्या सरांच्या या कारकिर्दीमध्ये संस्थेने जगाला हेवा वाटावा असा नावलौकिक कमावलेला आहे, आणि हे कधी शक्य होते जेव्हा एखादी संस्था आपली स्वतःची संस्था आहे असं म्हणून तिथला मुख्य जबाबदार माणूस काम करतो ना तेव्हा हे शक्य होत..
या संस्थेमध्ये स्वतःला झोकून देऊन सगळ्या सवंगड्यांच्या कामगारांच्या सोबत, सगळ्यांच्या सहकार्याने अगदी मायक्रो नियोजनाने म्हणजे ज्याला आपण स्मुक्ष असं म्हणतो अशा स्मूक्ष नियोजनाने कृषीक सारखे भव्य दिव्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असो किंवा अजून भीमथडी सारखी भली मोठी जत्रा असो हे सरांनी अत्यंत बारकाईने लक्ष देवून आपल्या संस्थेतील खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सर्वांना सोबत घेवून योग्य नियोजनाने आजपर्यंत पार पाडले आहेत…

सरांकडे पाहिल्यानंतर सरांचा विकासाचा दृष्टीकोन किती व्यापक आहे हे समजते. सरांचा पहाटे पाचला सुरु होणारा दिवस रात्री बारापर्यंत सुरुच असतो, रात्रीचा दिवस ज्याला म्हणतात ते नलवडे सर प्रत्यक्षात दररोज अनुभवतात, सुपारीच्या खंडाचेही व्यसन नसलेला, प्रचंड मेहनती, व वेळ आणि शिस्तीचा भोवता असलेला. हा माणूस म्हणून सरांची ओळख आहे.. आज त्यांच्या भोवती असलेली वलय पाहून अनेक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटतं आपणही निलेश नलवडे सरांसारख बनावं असे वाटत राहते मात्र त्यासाठी त्यांची मेहनत विचारात घेता यायला पाहिजे, त्यांनी आज पर्यंत केलेला संघर्ष विचारत घेता यायला पाहिजे, आदरणीय सरांचा आणि माझा परिचय आमच्या गावात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आला त्यावेळी सर तुम्ही त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होता आणि सदर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी आमच्या गावाने माझ्यावर दिली होती, तेव्हा त्या कार्यक्रमा वेळी तुमचा एक विद्यार्थी त्या समारोप कार्यक्रमात बोलता बोलता सहज बोलून गेला की ॲग्रीकॉलेज म्हणजे आमच्या साठी मंदिर आहे, आणि त्या कॉलेज मध्ये एक गाभारा आहे आणि त्या गाभाऱ्यात आमचा देव वसतो तो देव म्हणजे दुसर तिसरं कोणी नसुन माणसाच्या जन्माला येवून कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वला पोहाचेले सर तुम्हीं आहात..

हजारो तरुणांच्या गुरू स्थानी असणारे आपण आजही तितक्याच हक्काने या तरुणाच्या गळ्यातील ताईत आहात यात तिळमात्र शंका नाही हजारो तरुण, तरुणी, नोकरदार, शेतकरी, कामगार, यांचं भवितव्य उज्वल करणाऱ्या आणि माझ्या संस्थेच स्वतःच कृषी विद्यापीठ करायचं आदरणीय पवार साहेब, संस्थेचे चेअरमन आदरणीय राजेंद्र दादा आदरणीय अजित दादा यांचं असणारं अजून एक स्वप्न मला सत्यात उतरवायचं आहे म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या मार्गदर्शक आदरणीय श्री निलेशजी नलवडे सरांना या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ..!
आपलाच स्नेहांकित:
Ajinkya Arvind Gaikwad
Malegaon khurd Baramati

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *