म्हसवड मध्ये संघ एकसंघ असल्यानेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली : सुभाष नरळे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

म्हसवड मध्ये संघ एकसंघ असल्यानेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली : सुभाष नरळे

प्रविण राजे 

दहिवडी ता.18

प्राथमिक शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी म्हसवड मतदारसंघातून सभासद विकास पॅनलने राजाराम तोरणे यांच्यासारखा खमक्या उमेदवार दिला असून संपूर्ण संघ एकसंघपणे त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे विधान सातारा जिल्हा शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष सुभाषराव नरळे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद शाळा मार्डी नंबर एक येथील शिक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ज्ञानेश्वर जाधव, अंजना काळे, भागवत मॅडम, गणेश हिंगळकर हे शिक्षक बांधव तर अशोक जमाले, राम साळुंखे, कल्याण भागवत, वैभव पाटील, विजयकुमार शिंदे इत्यादी शिक्षक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सभासद विकास पॅनलचे उमेदवार राजाराम तोरणे यांच्या प्रचारानिमित्त मार्डी, इंजबाव या केंद्रातील इतर शिक्षकांशीही त्यांनी संवाद साधला.
या प्रचार दौऱ्यात बोलताना अशोक जमाले म्हणाले की विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळाने सभासद हिताचाच कारभार केलेला असल्यामुळे मतदारांचा राजाराम तोरणे यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. राजाराम तोरणे यांनी आपल्या आयुष्याची 25 वर्षे शिक्षक संघाचा खंदा कार्यकर्ता म्हणून घालवली आहेत. शिक्षकांच्या अडीअडचणीमध्ये मदत करण्याचे काम त्यांनी अखंडपणे केले आहे. त्यामुळे राजाराम तोरणे यांचा विजय निश्चित आहे.
दरम्यान राजाराम तोरणे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली असून मतदारांमधून त्यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. राजाराम तोरणे यांच्या विजयाची औपचारिकता बाकी असल्याचे दिसून येत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *