भारत सरकारच्या अन्नधान्यपुरवठा महामंडळाच्या सल्लागार संचालक पदी गणेश काटकर!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

माण खटाव प्रतिनिधी : धनंजय माने पाटील 

दि.16   भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार,अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय संचालित खाद्य पुरवठा महामंडळाच्या (FCI) केंद्रीय सल्लागार समितीवर संचालक म्हणून वडजल ता. माण येथील गणेश काटकर यांची निवड करण्यात आली आहे.

गणेश काटकर हे मराठा क्रांती मोर्चाचे सक्रिय कार्यकर्ते असून यापूर्वी त्यांनी राज्य समन्वयक  म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्याचबरोबर ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच नारायण राणे यांचे निकटवर्तीय समजले जातात.

या निवडीबाबत आमचे प्रतिनिधी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता माझे निवड झाली असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल, मंत्री चंद्रकांत दादा पाटील,खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या संधीतून चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न असेल.
ग्राहकांचे अन्न पुरवठ्यासंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करनार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीबद्दल मान आमदार जयकुमार गोरे माण तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे,गणेश सत्रे, सिद्धार्थ गुंडगे तसेच  मान आणि खटाव तालुक्यातील गणेश काटकर यांच्या मित्र परिवाराने निवडीबाबत अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *