म्हसवड शिक्षक मतदार संघात शिक्षकांची विजय बनसोडेंनाच पसंती..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रामाणिक आणि उमद्या नेतृत्वाला संधी मिळावी शिक्षकांची इच्छा..!

उमेश बुधावले

दहिवडी , ता. १५ :

म्हसवड शिक्षक मतदार संघात शिक्षकांची विजय बनसोडेंनाच पसंती..प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहिर झाल्यापासून म्हसवड मतदार संघातून विजय बनसोडे यांना उमेदवारी मिळवी ही अनेक शिक्षकांची इच्छा होती आणि विजय बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंन्तर शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. आणि शिक्षक संघाने विजय बनसोडे यांच्यावर विश्वास दाखवून उमेदवारी जाहीर केली…

देवापुर गावचे सुपुत्र विजय बनसोडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुळदेव पाटील वस्ती ता. माण या ठिकाणी कार्यरत आहेत. अत्यंत प्रामाणिकपणे नोकरी करत असताना शाळेचा माण तालुक्यात नावलौकिकशी केला..

विजय बनसोडे हे प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेमध्ये संचालक नसतानाही शिक्षकांच्या प्रश्नासाठी अनेकदा झगडले आहेत. कायमच शिक्षकांच्या प्रश्नासाठी निस्वार्थपणे काम केले आहे. त्यामुळे विजय बनसोडे हे शिक्षकांच्या काळातील ताईतच बनले आहेत. निवृत्त शिक्षकांच्या प्रश्नासाठी विजय बनसोडे नेहमीच पुढे असतात.

त्यामुळे अत्यंत प्रामाणिक आणि होतकरू आणि धडाडीचे कार्य करण्याची जिद्द मनामध्ये असणाऱ्या विजय बनसोडे यांना प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत संचालक म्हणून पाठवण्यासाठी अनेक शिक्षकांनी चंग बांधून पायाला भिंगरी बांधली आहे.

आणि त्यांच्या मनमिळावू व शांत स्वभावामुळे म्हसवड शिक्षक मतदार संघातून विजय बनसोडे निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे..

 

फोटो

विजय दादासो बनसोडे

उमेदवार म्हसवड शिक्षक मतदार संघ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *