रेल्वे अधिकाऱ्यांनी आंदोलन माघे घ्या म्हणूण वडूथ व आसगांव ग्रामस्थांना दिली लेखी हमी …..

रेल्वे अधिकाऱ्यांनी आंदोलन माघे घ्या म्हणूण वडूथ आसगांव  ग्रामस्थांना दिली लेखी  हमी ….

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

साताराप्रतिनिधी

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराने घाईघाईत केलेले निकृष्ट दर्जाचे काम यामुळे वडूथआसगाव येथील रेल्वे पुलाखाली पावसाचेपाणी साठते.सतत अपघात होत असून तत्काळ येथील अडचणी दूर करण्यासाठी वडूथ आसगावकर यांनी रेल रोको करु असा ईशारादिला   थेट रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  लक्ष धालून लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन लेखी दिले  नुसता रेल रोको आंदोलनचा इशारा वडूथ,आसगावकरांनी दिला तर काम निकाली काढण्यात यश आले

गेली महिन्यांपासून जरंडेश्वर रेल्वे स्टेशन जवळ वडूथ ,आसगाव रस्त्यावर नव्याने पुलाचे बांधकाम सुरू आहे.या पुलाचे बांधकामकरणाऱ्या अभियंत्याने आणि ठेकेदाराने घाईघाईत काम करताना अनेक चुका केल्या, निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पहिल्याच पावसातअनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.यात पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी साठते, मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे.यामुळे दुचाकीवाहनधारकांना कसरत करावी लागते. अनेक जण घसरून पडतात.याबद्दल रेल्वे प्रशासनाला कळवले, भेटायला गेलेल्या स्थानिकांचेऐकून हि घेतले जात नाही.यामुळे चिडलेल्या स्थानिक नागरिकांकडून अचानक रेल रोको आंदोलन करण्याची तयारी सुरू केली होती.
याबाबत  काही कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलनाची माहिती दिली.यावर थेट रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधून हा प्रश्न,त्याचीगंभीरता, ठेकेदार आणि अभियंता सिंग यांच्या असहकार्य बाबत तक्रार करून लवकर कामाच्या ठिकाणीच्या समस्या सोडविण्यासाठीसुचना देण्यासाठी सांगितले.वरिष्ठांनी ही तत्काळ दखल घेतली काम करु , लेखी अशी ग्वाही दिली.

वडूथ आसगाव स्थानिक नागरिकांकडून संरपंच किशोर शिंदे वडूथ  आनंदा शिंदे आसगाव    सामाजिक कार्यकर्ते मदन साबळेयांच्याशी संपर्क केला जातो. खासदार .उदयनराजे भोसले आमदार महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले मदन साबळे हेअभियंता असून वडूथ,आरळे पुलाचे काम, मुख्य रस्त्याचे काम सुरू असताना पुर्णवेळ लक्ष ठेवून होते. सातारा रोड ते वडूथ रस्ताचे कामनिकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना ते निकृष्ट दर्जाचे होत असताना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पाॅटवर बोलवून काम बंदपाडले. रेल्वेच्या पुलाच्या कामामुळे अनेक त्रास होत असताना अधिकाऱ्यांना याविरोधात रेल्वे प्रशासनाला भेटून माहिती दिली.तरीहीदखल घेतली गेल्याने रोको आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी तयारी केली. अनेकांची यासाठी साथ मिळत असताना आंदोलना च्याइशाऱ्याआधीच रेल्वे अधिकाऱ्यांनी आंदोलन माघे घ्या म्हणूण वडूथ आसगांव  ग्रामस्थांना दिली लेखी  हमी …..

*ग्रामपंचायत आसगाव व ग्रामपंचायत वडूथ* पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की आपण *शुक्रवार दिनांक 4/ 11/ 2022 रोजी* माननीय *जिल्हाधिकारी* सातारा यांना दिलेल्या निवेदनानुसार *जरंडेश्वर रेल्वे स्टेशन येथे* दहा वाजता केले जाणारे *रेल्वे रोको आंदोलन तूर्त स्थगीत* करण्यात आलेले आहे

सदर बाबतीत *रेल्वे अधिकारी माननीय सक्सेना साहेब व ठेकेदार यांच्या वतीने श्री मस्के साहेब* यांनी घटनास्थळी येऊन आपणास लेखी हमीपत्र दिले आहे की पुणे साईडचा रस्ता सिंगल ट्रॅक एक महिन्याच्या आत पूर्ण करून देणार व बाकी उर्वरित सर्व काम पुढील तीन महिन्यांमध्ये पूर्ण करून देण्याची हमी लेखी स्वरूपामध्ये आपल्या ग्रामपंचायतींना दिलेली आहे व त्यामुळे उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांशी चर्चा करून आपण हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी *सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर 2022* रोजी होणारे रेल रोको आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे याबाबतची नोंद परिसरातील सर्व नागरिकांनी घ्यावयाची आहे
आपले नम्र ,
सरपंच,
ग्रामपंचायत आसगाव .
व सरपंच ग्रामपंचायत वडूथ व सामाजिक कार्यकर्ते मदन सबळे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ वडुथ आसगांव तालुका सातारा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *