जीवघेण्या भुयारी मार्गाविरोधात रेल रोको
-७ नोव्हेंबर रोजी रेल रोकोचा इशारा
-जिल्हा प्रशासनाला दिली निवेदने
गोडोली -प्रतिनिधी
जरडेश्वर रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या वडूथ- सातारा रोड साठी जाणाऱ्या नव्याने तयार केलेला दुहेरी मार्गासाठी भुयारी मार्ग मोठ्या अडचणीचा बनला आहे.रटाळ आणि नियोजन नसलेले या भुयारी मार्गाचे काम रेल्वे प्रशासनाकडून झाले असून या मार्गाने ना ऊस वाहतूक ना वाहन चालकांना सुरक्षित नाही. याबाबत वेळोवेळी वडूथ,आसगाव ग्रामपंचायतीकडून निवेदने,सुचना करून रेल्वे प्रशासनाने दखल घेतली नाही. याविरोधात वडूथ,आसगाव, सातारा रोड, जळगाव,पाडळी गावचे शेतकरी एकवटले असून त्यांनी दि.७ नोव्हेंबर रोजी रेल रोको आंदोलन करणार असल्याचा रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला इशारा दिला आहे.
वडूथ ते सातारा रोड ,पाडळी, जळगाव,आसगाव मार्गे कोरेगावला जाणारा हा हम रस्ता आहे.या रस्त्यावर नव्याने रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम करताना तिथे भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. तो अत्यंत चुकांचा, गैरसोय, वाहतुकीला धोकादायक झाला असून ऊस वाहतूक या मार्गातून होणार नाही.
सध्या वडूथ नजीकच्या रेल्वेचे दुहेरी कारणाचे काम सुरू असून रेल्वे प्रशासनाने केलेल्या भुयारी मार्गाच्या बोगद्या ओलांडून जाणे म्हणजे वाहन चालकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो.
सातारा रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक अतिशय धोकादायक वळण व अपघात प्रवण क्षेत्र निर्माण झाले आहे.
सध्या वडुथ ते सातारारोड बोगद्याचे काम बंद असलेने या मार्गावरील मोठी वर्दळ असून सर्व वाहतुक शिवथर मार्गे वळसा घालून जावे लागते. हा नाहक वाहन धारकांना चांगलाच भुर्दंड सोसावा लागतो.यात सतत अपघात होत असूनही याबाबत ना रेल्वे प्रशासन ना जिल्हा प्रशासन दखल घेत नाही.
या रस्त्यामुळे गेली काही महिने परिसरातील शेतकऱ्यांना, वाहन धारकांना नाहक त्रास होत आहे.या मार्गाची लवकरात लवकर योग्य दुरुस्ती करावी. रेल्वे प्रशासनाने सर्वांचीहोणारी ससेहोलपट थांबवावी, अन्यथा लक्षवेधी आंदोलन करू असा इशाराही खा.छत्रपती उदयनराजे मित्र मंडळाचे मदन साबळे यांनी दिला आहे.
रेल्वेच्या भुयारी मार्गाच्या कामामुळे अनेक त्रास होत आहे. याबाबत अनेक वेळा निवेदन रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून दिले आहे.तरीही दखल घेतली जात नसल्याने आता रेल रोको आंदोलन करणार असल्याचे वडूथचे सरपंच किशोर शिंदे आणि आसगावचे सरपंच
आनंदा शिंदे यांनी दिली.












Leave a Reply