माण-खटाव प्रतिनिधी : धनंजय माने पाटील
दि. 2 ऑक्टोबर रोजी पुणे-बंगलोर कॉरिडोर बचाव संघर्ष समितीच्यावतीने धनाजी ओंबासे आणि कृष्णा खोरे पाणी संघर्ष समितीचे डॉ. महादेव कापसे यांनी म्हसवड बस स्थानक परिसरात रस्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला होता.
त्या जनआक्रोश मोर्चाच्या विरोधात निषेध म्हणून भाजपाच्या वतीने विजय धट यांनी त्याचवेळी त्याचठिकाणी निषेध मोर्चा काढण्याचे निवेदन म्हसवड पोलीस स्टेशनला दिले होते.
एकांदरीत मोर्चा आणि प्रतिमोर्चासंबंधी कोणतीही कायदा-सुव्यवस्तेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राजकुमार भुजबळ यांनी जमावबंदी आदेश लागू करण्याबाबतचा अहवाल माण तहसीलदार यांना पाठवण्यात आला होता.
त्यानुसार माणचे प्रभारी तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांनी दि. 2 ऑक्टोबर रोजी संपूर्ण 24 तासासाठी जमावबंदीचा आदेश म्हसवड शहरासाठी लागू केला आहे. त्याअनुषंगाने म्हसवड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केल्याची माहिती लायव्ह महाराष्ट्र 24 ला मिळाली आहे.












Leave a Reply