माण तालुक्याचे तहसीलदार व प्रांत कारवाई करतील? संगणकाचे ज्ञान नसणार अशिक्षित कुकुडवाड चा मंडल अधिकारी कामावर कसा? माण तहसीलदार कार्यलयातील प्रकार ,जनतेला मोठा आर्थिक फटका: कारभाराची तत्काळ चौकशी करण्याची मुख्यमंत्री याच्या कडे जनतेची मागणी मागणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 सातारा प्रतिनिधी :- माण,जिल्हा सातारा येथील तहसीलदार कार्यलयाच्या अंतर्गत कुकडवाड मंडल अधिकारी शिंदे हे गेले काही दिवस काम करत असून मोठ्या प्रमाणात चुकीची काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेली आहेत.त्यांची माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय आयुक्त यांनी तत्काळ चौकशी करावी व सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास कमी करावा, माननीय मंडळ अधिकारी शिंदे हे कुकडवाड विभागात कामावर रुजू आल्यापासून या परिसरामध्ये नोंदीसाठी मोठ्या प्रमाणात विलंब करतात व संबंधित व्यक्ती नोंद करण्यासाठी गेल्यानंतर त्याला आर्थिक मागणी करतात यामुळे सर्वसामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणाला आर्थिक पिळवनुक सहन करावी लागत आहे त्याच बरोबर स्वतःकडे मोठे अधिकार आहेत असे वागून लोकांना वेगळ्या पद्धतीने पैसे मागत आहेत संबंधित मंडल अधिकारी यांच्याकडे लोक वारस नोंदीसाठी गेले असता अनेकांच्या वारस नोंदी यांचे कागदे बाजूला ठेवली जातात त्याचबरोबर मंडल अधिकारी शिंदे यांच्या कार्यालयामध्ये अनेक एजंट चा सुळसुळाट आहे हे एजंट पैसे गोळा करतात व माननीय शिंदे यांना घेऊन जातात संबंधित माननीय शिंदे यांच्या कार्यालयातच एजंटचा मोठा सुळसुळाट आहे हे एजंट एखाद्या व्यक्ती त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर एजंटला पहिल्यांदा भेटावे लागते व त्यानंतर शिंदे यांच्याकडे जावे लागते तसेच मंडल अधिकारी शिंदे यांचे प्रत्येक गावामध्ये दोन दोन वसुलीसाठी एजंट ठेवलेले आहेत असे प्रत्येक गावामध्ये कोणताही काम असेल तर हे शिंदे त्या गावातील एजंट थ्रू पैसे गोळा करून काम करून घेतात अशा मंडल अधिकाऱ्यांनी दहिवडी या ठिकाणी सेवा सुरू केली आहे येथे कामाला सुरुवात केली त्या संपूर्ण कामाची चौकशी विभागीय आयुक्त मार्फत करण्यात यावी संबंधित मंडलाधिकारी याला कोणतेही प्रकारे कम्प्युटरचे ज्ञान नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये मंडल अधिकाऱ्यांना कम्प्युटरचे ज्ञान असावे लागते मंडळ अधिकाऱ्याला कम्प्युटरचे ज्ञान नसल्यामुळे संपूर्ण प्रकारचे निकाल हा दलालांच्या मार्फत माध्यमातून लिहून घेत असतो हे दलाल म्हणजे या मंडल अधिकाऱ्याचे एजंट हे लोकांच्याकडून आपल्याला हवा तसा निकाल करून घेतात या संदर्भात महसूल विभागाने तत्काळ दखल घेऊन याची खाते नियम चौकशी करावी व गेल्या दहा वर्षाच्या संपूर्ण कामकाजाची चौकशी माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करावी माननीय मंडल अधिकारी शिंदे यांना कोणत्याही प्रकारे कॉम्प्युटरचे व ऑनलाईन कोणतेही ज्ञान नसताना हा व्यक्ती त्या ठिकाणी बसून ते काम कोणाकडून करून घेतो हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून हे कॉम्प्युटर वरती काम करण्यासाठी प्रत्येक गावांमधील काही एजंट ते काम करून त्याला निकाल पत्र लिहून देतात हे अतिशय मोठे आश्चर्य आहे ज्या व्यक्तीला कॉम्प्युटरचे ज्ञान नाही जो व्यक्ती कॉम्प्युटरचा हाताळता येत नाही असा व्यक्ती त्या ठिकाणी मंडल अधिकारी म्हणून कसा हा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय या व्यक्तीच्या काळात पूर्ण मंडल विभागांमध्ये एजंटचा सुळसुळाट झाला असल्यामुळे तत्काळ आपण आपल्या विभागामार्फत या व्यक्तीची संपूर्ण चौकशी करावी मंडल अधिकारी शिंदे याने गेल्या दहा वर्षांमध्ये जे जे प्रकरणे हाताळी आहेत ज्या ज्या प्रकरणाचे निकाल दिलेले आहेत ती संपूर्ण चौकशी माननीय आयुक्त यांच्या कार्यालया मार्फत व माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत झाली पाहिजे त्याशिवाय संबंधित लोकांना न्याय मिळणार नाही ही आपल्याला विनंती करतो व सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा या भावनेतून आम्ही आपल्याकडे हा अर्ज करत आहोत अपोन याची तत्काळ दखल घ्याल ही विनंती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *