कुकुडवाड जिल्हा परिषद गटात गोरगरिबांना न्याय मिळाला नाही राज्यकर्ते निवडणुकी नंतर कुठे असतात वंचित बहुजन आघाडी चे युवा अध्यक्ष सनी तुपे यांचा सवाल
वरकुटे:- सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक लवकरच होणार आहे म्हणून आता कुकुडवाड गटातील नेते जागरूक झाले असून गोवोगावी जनतेचे पाय धरत आहे परंतु गेली जिल्हा परिषद निवडणूक झाल्या नंतर हेच नेते कुठे होते गेल्या साडेचार वर्षे गोरगरिबांना वाली कोण होते शासनाच्या किती योजना जनतेला थेट मिळवून दिल्या यांची यादी यादी प्रस्थापीत नेत्यांनी जाहीर करावी अन्यथा गोरगरीब व वंचित समाज मातदानातून योग्य तो धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असे मत वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा युवा अध्यक्ष सनी तुपे यांनी व्यक्त केले
कुकुडवाड गट हा सातारा जिल्ह्यातील अतिशय दुर्गम गट व अविकसित भाग म्हणून ओळखला जातो विकास आणि सरकारी योजनांची गाजरे फक्त निवडणूक काळात दाखवली जातात निवडणूक नंतर जनतेला कोणीही वाली नसते आजपर्यंत कुकुडवाड गटातील जनतेने विश्वास ठेवला परंतु या पुढे जनता विश्वास ठेवणार नाही निवडणुक काळात जनतेत वंचित बहुजन आघाडी जनजागृती मोहीम राबवले व गोरगरीब जनतेला वंचीत का ठेवले याचा जाब विचारल्या शिवाय राहणार नाही असे सनी तुपे यांनी सांगितले
वंचित बहुजन आघाडी कुकुडवाड जिल्हा परिषद निवडणूक ताकतीने लढवणार असून आम्ही निवडणूक जिकणार आहे असा विश्वास सनी तुपे यांनी व्यक्त केला













Leave a Reply