कुकुडवाड जिल्हापरिषद गटासाठी भारतीय जनता पक्षाची रणनीती तयार ?कार्यकर्ते लागले कामाला !पक्ष संघटनेतीलच उमेदवार देणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कुकुडवाड जिल्हापरिषद गटासाठी भारतीय जनता पक्षाची रणनीती तयार कार्यकर्ते लागले कामाला

दहिवडी प्रतिनिधी:-सातारा जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमाचा पहिला टप्पा जाहीर झाला असून गटाच्या सीमा रेषा निश्चित झाल्या आहेत लवकरच आरक्षण सोडत निघणार असून लवकरच निवडणूक तारीख जाहीर होईल याचा अंदाज बांधून कुकुडवाड गटात भाजप कार्यकर्ते कामाला लागले आहेत भाजप  युवा मोर्चाची टीम या गटात सक्रिय काम करत असल्याचे दिसून येत आहे या सर्व गटावर भाजप चे तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे व आमदार जयकुमार गोरे यांचे पूर्ण लक्ष आहे असे दिसून येते हा गट जिकायचाच असा निर्धार आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे असे दिसून येते यांचा पूर्व पाठ म्हणजेच विरळी सारख्या मोठया गावात ओबीसी मोर्चा चे अध्यक्ष पद दिले आहे तर देवापुर येथे अनुसूचित जाती मोर्चा माण चे अध्यक्ष पद दिले आहे देवापुर हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे त्या मुळे नक्कीच देवापुर येथे भाजप ला ताकत मिळणार आहे तर वळई हे गाव भाजप च्या मागे ताकतीने उभे राहते या गावातील युवक कार्यकर्त्याला ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पद दिले आहे आमदार गोरे यांना याच गावाने एक हजार मताचे लीड दिले होते याच गावाला आमदार गोरे यांनी अनेक कामे केली आहेत तर याच गटातील आध्यत्मिक आघाडी माण चे अध्यक्ष पद हे वडजल गावात दिले आहे या निवडी विचार करून केलेल्या आहेत शेनवडी गावात तालुका सरचिटणीस ची जबाबदारी दिली आहे भाजप या गटात निश्चित आपली ताकत वाढवण्यासाठी नव्या नेतृत्वाला संधी देत आहे या भागातील युवक भाजप ला मोठा पाठींबा देत असल्याचे वळई येथील सत्कार कार्यक्रमाच्या अनुषंगाने निदर्शनास आले आहे या गटात भजाप ने आपली प्रचाराची मोठी टीम तयार केल्याचे दिसुन येते एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन हा जिल्हा परिषद गट जिकायचाच हा प्रयत्न भजाप या निमित्ताने करत आहे

त्यासाठी भाजप कडे मोठी टीम तयार आहे
म्हणजे भाजप सातारा जिल्हा परिषद निवडणूक ताकतीने लढवणार असल्याचे व मतदारसंघ मजबूत करण्यासाठी वाटचाल करत असल्याचे दिसून येते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *