कुकुड़वाड जिल्हापरिषद गट भाजपचाच- शिवाजी शिंदे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कुकुड़वाड जिल्हापरिषद गट भाजपाच जिंकणार- शिवाजी शिंदे

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा वळई ग्रामपंचायत व नागरीकांमार्फ़त आयोजित केला होता.
यावेळी रमेश काशिद भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष,प्रशांत गोरड माण तालुका ओबीसी अध्यक्ष,संजय काटकर भाजपा आध्यात्मिक आघाडी भाजपा तालुकाध्यक्ष,यशवंत पारशी भाजपा माण तालुका सरचिटनीस,असे विविध पदांवर निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे,युवा नेते चिन्मय कुलकर्णी, कुकुडवाड ग्रा.प.सदस्य मनोज काटकर,विरळी सरपंच प्रशांत गोरड,युवानेते गणेश काटकर वडजल चे मा सरपंच तुळशीराम काटकर,वडजल विकास सेवा सोसायटी चे मा चेअरमन रंगनाथ काटकर,वळईचे सरपंच बबन दादा गोरड,बजरंग वाघमारे व मोठ्या प्रमाणात नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शिवाजी शिंदे यांनी नूतन पदाधिकारी यांनी पदास साजेसे असे कार्य करावे व पक्षाची माण उंचावेल असे काम करण्याचे आवाहन केले.कोणत्याही परिस्थिति मधे कुकुड़वाड़ जिल्हा परिषद गटात भाजपालाच यश भेटल व एक चांगली संघटना बांधून यश खेचून आणू असे प्रतिपादन युवा नेते चिन्मय कुलकर्णी यांनी केले.वडजल व आजुबाजूची गावे नक्कीच भाजपा बरोबर राहतील व विरोधकांना योग्य जागा जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य युवानेते गणेश काटकर यांनी सांगितले.तसेच वळई गावचे सरपंच बबन दादा काळेल यांनी राष्ट्रवादी वर टिकस्र सोडले व आ.जयकुमार गोरे यानी आमदारकी पणाला लावून गावाचा व भागाचा विकास केला भागाला हक्काचे पाणी मिळवून दिले.तसेच ज्या लोकाना टेम्बू,उरमोड़ी,जिहे कठापूर ही नाव देखील माहित नाही ते हंगामी नेते श्रेय घेण्याच्या मागे लागले आहेत असा टोला लगावला.तसेच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हंगामी नेत्यांना बाजूला ठेवून जनता भाजपाच्या उमेदवारांना मोठ्या मतधिक्काने विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त केला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *