– दक्षिण कोरियात सेओल शहरात घुमला ‘जय भवानी जय शिवाजी’ चा जयघोष

सातारादक्षिण कोरियात सेओल शहरातजय भवानी जय शिवाजीजयघोषात मराठी मंडळ कोरिया (एम एम के) यांच्या वतीनेअखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील आधारीतशेर शिवराजया चित्रपटाच्या खासशोचेरविवार (दि. २९) रोजी आयोजन करण्यात आले होते. चित्रपट पाहण्यासाठी कोरियास्थित मराठीजणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलीहोती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सेओल शहरातील कोणकुक विद्यापीठाच्या थिएटर मध्ये शेर शिवराज चित्रपट प्रदर्षित करण्यात आला.

मागील दोन वर्षे कोविडमुळे सर्व कार्यक्रम बंद होते. यावर्षी मराठी मंडळ कोरिया ने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरीलमराठी चित्रपटाचे कोरियात आयोजन करून पहिला आणि नवीन कार्यक्रम सुरू करण्याची संधी मिळाली. हा अनुभव अप्रतिम होता, जिथे थोर राजा छत्रपती शिवाजी यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मराठी समाज एकरूप होऊन एकवटला. शेवटीकोल्हापूरच्या अतुल खोत यांनी शिव गर्जना देऊन कार्यक्रमाचे सांगता केली. हा कार्यक्रम यशस्वी आणि अविस्मरणीय करण्यासाठीसंतोष पाटील, अतुल खोत, किरण निर्मळ, ऋषिकेश ढवळे ( सर्वजण  कोल्हापूर), दीक्षा शिंदेपाटील (अवसरी खुर्द, पुणे), गौरवथोरात (संगमनेर), प्रदीप देसले (धुळे), सुरज मोरे आणि अभिजित कदम (सातारा) मराठी मंडळ कोरिया चे सर्व सदस्य यांनी उत्कृष्टनियोजन केले त्यानंतर सर्वांनी तुकसेओम पार्कमध्ये डब्बा पार्टीचा आनंद लुटला. हा देखील मराठी मंडळ कोरियाचा एक महत्वाचाकार्यक्रम ठरला शेवटी आभार दिलीप पाटील (सांगली) यांनी मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *