वंचित बहुजन आघाडी कुकुडवाड जिल्हा परिषद निवडणूक लढवणार कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय सनी तुपे यांची माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वंचित बहुजन आघाडी कुकुडवाड जिल्हा परिषद निवडणूक लढवणार कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय सनी तुपे यांची माहिती

कुकुडवाड:- सातारा जिल्हा परिषद निवडणूक वंचित बहुजन आघाडी कुकुडवाड जिल्हा परिषद गट ताकतीने निवडणूक लढवणार असून सर्वसामान्य व बहुजन घटकांना न्याय देण्यासाठी व जातीपातीच्या राजकारणाचा अंत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी निवडणूक नेहमीच जनजागृती करत असते,समाजात गोरगरीब जनतेला न्याय मिळावा यासाठी माननीय प्रकाशजी आबेडकर साहेबाच्या नेतृत्वाखाली आज आम्ही काम करत असून इथल्या प्रस्थापित नेत्याच्या विरोधात ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे असा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला असून ही निवडणूक ताकतीने लढवली जाईल या भागातील विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे राजकारणात आम्हीच पाहिजे असा काही लोकांचा मतप्रवाह आहे बहुजन समाज आज राजकारणात हद्दपार होत असून सामान्य जनता आत निवडणूक कधी येईल व परिवर्तन कसे करता येईल याची वाट पाहत आहे म्हणून ही निवडणूक वंचित आघाडी ताकतीने लढवले असा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठीत झाल्याचे वंचित बहुजन आघाडी चे युवा अध्यक्ष सनी तुपे यांनी सागितले जिल्हा परिषद कुकुडवाड गटात वंचित घटकांना न्याय का दिला जात नाही त्याचा हक्काच्या योजना कुठे आहेत गेल्या पाच वर्षात वंचितांना फसवले याच उत्तर निवडणूक काळात मुख्य पक्षानं द्यावे लागेल असेही सनी तुपे यांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *