भाऊसाहेब माने यांना कुकुडवाड पंचायत समिती साठी उमेदवारी द्यावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे युवक मागणी करणार
दहिवडी: सातारा जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होण्या पूर्वीच कुकुडवाड जिल्हा परिषद गटात राजकीय धुरळा पाहायला मिळत आहे कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी दहिवडी येथे परिसंवाद यात्रे दरम्यान कार्यकर्त्यांच्या बरोबर थेट चर्चा केली त्या नंतर कुकुडवाड गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून कुकुडवाड गट हा राष्ट्रवादी काँग्रेस चा बालेकिल्ला करण्यासाठी सर्वजण कामाला लागले आहेत तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले पाहिजेत यासाठी कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून युवा नेते व सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ओळख असणारे भाऊसाहेब माने यांनी कुकुडवाड पंचायत समिती साठी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने द्यावी अशी मागणी या भागातील युवक पक्षाकडे करत आहेत
कुकुडवाड गटात आत परिवर्तनाचे वारे वाहत आहे निवडणूक कधी लागेल याची वाट न पाहता प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आहे.
भाऊसाहेब माने हे कळचौडी गावचे सरपंच असून अनेक सामाजिक संस्थाच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करत असतात एक आदर्श सरपंच म्हणून ते परिसरात काम करत असतात या भागातील युवकाचा मोठा पाठींबा भाऊसाहेब माने यांना आहे त्याना पक्षाने उमेदवारी दिली तर निश्चित ते विजयी होतील या भागातील विकासाचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी ते प्रयन्त करतील अशी आशा आहे म्हणूनच त्याना राष्ट्रवादी काँग्रेस ने उमेदवारी द्यावी अशी मागणी युवकांच्या मधून होत आहे













Leave a Reply