पक्षाने संधी दिली तर कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार :चंद्रकांत काटकर
वरकुटे: सातारा जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी सुरू असून अनेकांनी कुकुडवाड जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची प्रत्येक गावात पायाभरणी ला सुरवात केली आहे त्याच प्रमाणे अनेक कार्यकर्ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे त्याच प्रमाणे वडजल गावचे सुपुत्र व उधोजक चंद्रकांत काटकर यांनी बोलताना सांगितले की गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस चा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी काम करत असून वडजल विकास सेवा सोसायटी च्या अध्यक्ष पद सांभाळ ले आहे त्याच बरोबर ग्रामपंचायत वडजल मधील सत्ता एकहाती माझ्या ताब्यात असून आत या भागात माझा मोठा संपर्क आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस ने संधी दिली तर मी कुकुडवाड जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे असे स्पष्ट मत चंद्रकांत काटकर यांनी व्यक्त केले
कुकुडवाड जिल्हा परिषद गटाला नेहमीच वेगळी वागणूक दिली आहे इथला भाग पाहता अपोन सर्वजण महाराष्ट्र राज्यात आहोत काय याची जाणीव करावी लागते मा प्रभाकर देशमुख माण मधील राजकारणात आल्या पासून त्यांनी कुकुडवाड जिल्हा परिषद गटावर विशेषतः लक्ष दिले असून काही योजना या भागात देशमुख साहेबाच्या माध्यमातून सुरू आहेत
प्रभाकर देशमुख यांचे हात बळकट करण्याची संधी जिल्हा परिषद निवडणूक दरम्यान या भागाला आली आहे . कुकुडवाड जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादी काँग्रेस चा बालेकिल्ला आहे मी स्वतः या भागात अनेक वेळा सामाजिक कार्यात सक्रिय असतो म्हणूनच ही निवडणूक ताकतीने लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस ने संधी दिली तर मी निवडणूक लढवणार असल्याचे मा चंद्रकांत काटकर याने मनोगत व्यक्त केले.













Leave a Reply