मैत्रेय’च्या माध्यमातून मैत्रीपूर्ण वातावरणात निबंध स्पर्धा उत्साहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पाणलिंग विद्यालयात साजरी झाली प्रबोधनात्मक शिवजयंती

वावरहिरे प्रतिनिधी /एकनाथ वाघमोडे

वावरहिरे ता.माण या ठिकाणी श्री पाणलिंग विद्यालयात मैत्रेय फाउंडेशन वावरहिरे यांचे माध्यमातू निबंध स्पर्धा आयोजित करून छ. शिवरायांना प्रबोधनात्मक आणि वैचारिक आदरांजली वाहण्यात आली.

छ. शिवाजी महाराज हे विद्यार्थ्यांना माहित व्हावेत,त्यांचं अलौकिक कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचाव,त्यांचे विचार त्यांचा दूरदृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजला जावा यासाठी मैत्रेय फाउंडेशनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,या स्पर्धेत तब्बल ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यावेळी ५वी ते ७वी या गटात प्रत्येकी तीन व उत्तेजनार्थ त्याचप्रमाणे ८वी ते १०वी या गटासाठी प्रत्येकी तीन व उत्तेजनार्थ क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य बक्षीस स्वरूपात वितरित करण्यात आले.

यावेळी उपस्थित सेवानिवृत्त कक्षअधिकारी श्री.तानाजी भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. यावेळी छ.शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला आदर्श मानून संविधान लिहिणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींनाही उजाळा देण्यासाठी आणि भारतीय संविधान विद्यार्थ्यांना माहित व्हावं,यासाठी श्री.हणमंतराव अवघडे गुरूजी यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयास संविधानाची प्रत दिली.यावेळी पद्माकर भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.खराटे ए.जी.यांचे मोलाचे सहकार्य लाभले.मैत्रेय फाउंडेशन अध्यक्षा माधुरी भोसले,हेमाकांत बुट्टे,दिलीप भोसले, बाळू भोसले,कैलास भोसले,विलास भोसले, मधुकर भोसले, सदाशिव भोसले, यांचे सहकार्य आणि मार्गदर्शनाने आजचा हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ वाघमोडे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री.रुपनवर सर यांनी केले. यावेळी विजेते स्पर्धक आणि विद्यार्थी वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *