महाविकास आघाडी प्रणीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा १३/०ने पराभव
प्रविण राजे /दहिवडी प्रतिनिधी
संपुर्ण माण तालुक्याचे लक्ष लागुन राहिलेल्या वावरहिरे विकाससेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप प्रणीत श्री पाणलिंग शेतकरी विकास पॅनेलने १३ जागा जिंकत एकहाती विजय मिळवत पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. गेली अनेक वर्षे या सोसायटीवर आमदार गोरे गटाची असणारी सत्ता या निकालातुन अधिक मजबुत आणि घट्ट झाली.
या ठिकाणी भाजप विरुध्द महाविकास आघाडी अशी सरळ लढत पार पडली. भाजप प्रणीत श्री पाणलिंग शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व पंचायत समित सभापती रंजना जगदाळे, बाबासो हुलगे, रमेश कदम ,चंद्रकात वाघ आदींनी केले. तर महाविकास आघाडी प्रणित पॅनलचे नेतृत्व शामराव राऊत ,सिताराम कदम, देवराज तरटे,अशोक आनेकर यांनी केले.
रविवार (दि २०) रोजी पार पडलेली मतदान प्रकियेत एकुण ९४६ मतदारांपैकी ६३१मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
एकुण १३जागेसाठी २७ उमेदवार रिंगणात होते. अतितटीच्या झालेल्या या निवडणुकीत श्री पाणलिंग शेतकरी विकास पॅनलने बाजी मारत सर्वच्या सर्व १३जागा जिंकत पंधरा वर्षाची सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळविले.तर विरोधी गटाला खातेही खोलता आले नाही. सभासदाचा विश्वास सार्थ ठरवुन सोसायटीच्या माध्यमातुन शेतकर्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगुन नवनिर्वाचित संचालक श्री भगवान गुळीक, विश्वास पांढरे यांनी सभासद व कार्यकर्त्याचे आभार मानले.विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे आमदार जयकुमार गोरे, सभापती रंजना जगदाळे ,जि.प.सदस्य अरुण गोरे व शेतकरी सभासद,ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे—–
सर्वसाधारण प्रवर्गातुन. कुलकर्णी रविद्र पंढरीनाथ, गोसावी बबन बापु,घनवट अशोक आण्णा,घाडगे सुरेश आबाजी,जाधव जगन्नाथ निवृत्ती,राऊत किसन महादेव ,साळुंखे तानाजी नानु, पांढरे विष्णु पांडुरंग.
महिला राखीव प्रवर्गातुन- पांढरे ताई सोपान,भुजबळ सुंनदा एकनाथ
इतर मागास प्रवर्गातुन – वाघ बाजीराव भगु
विजा/भज/विमाव प्रवर्गातुन – विश्वास बाबासो पांढरे
अनुसुचीत जाती /जमाती प्रवर्गातुन गुळीक भगवान गंगाराम हे सर्व उमेदवार विक्रमी मतांनी विजयी झाले.












Leave a Reply