संग्राम नरळे मुळे माणची देशात मान उंचावेल
प्रविण राजे / माण प्रतिनिधी
माण तालुका हा पहिल्यापासूनच रत्नांची खाण म्हणून ओळखला जातो.संग्राम नरळे यांची चौदा वर्षाखालील सातारा जिल्हा संघाच्या उपकर्णधार म्हणून निवड झाल्यामुळे पुन्हा एकदा माणच्या शिरपेचात मनाचा तुरा उभा केला आहे.संग्राम नरळे हा माण तालुक्यातील एका छोट्याश्या डोंगराळ भागात असणाऱ्या पर्यंती गावचा आहे. सध्या शिक्षणानिमित्त तो सातारा मध्ये राहत आहे.
महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशनच्या मान्यतेने पुणे येथे दि.11 ते 18 फेब्रुवारी दरम्यान आयोजित निमंत्रितांच्या 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड करण्यात आली.यावेळी फलंदाजी मध्ये अप्रतिम हातकंडा असणाऱ्या संग्राम नरळे याची जिल्हा संघाच्या उपकर्णधार पदी निवड करण्यात आली.
संग्राम ला पहिल्यापासूनच क्रीडा क्षेत्रात खूप आवड होती. मला क्रीडा क्षेत्रामध्येच करिअर करायचं आहे अशी जिद्द होती. त्याचे वडील सुभाष नरळे (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ),यांनी त्याच्या जिद्दीस पाठिंबा देण्याचे ठरवले. त्याला रोज सकाळी पाच वाजता उठून पाच किलोमीटर धावणे त्याचबरोबर एकही दिवसाचा खंड ण पडता क्रिकेट चा सराव त्याच्याकडून करून घेतला . आणि केवळ या सगळ्या मेहनती मुळेच आज,संग्राम ध्येयाच्या दिशेने कित्येक पावले जवळ आला.सध्या तो साताऱ्यातील टी. सी. सी अकॅडमि मध्ये प्रशिक्षण घेत आहे.
त्याच्या मेहनती स्वभावाचे कौतुक करत माण तालुक्यातील शैक्षणिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. सुवर्णवेध उद्योग समूह इंडिया तर्फे संग्राम नरळे चा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.












Leave a Reply