केंजळ ता. वाई येथील युवकांनी व ग्रामस्थांनी दिनांक ११ च्या मध्यरात्री ग्रामपंचायत कार्यालय केंजळ समोरील पटांगणात छत्रपतीशिवरायांचा पूर्णाकृती स्मारक चबुतरा बांधून त्यावर स्थापित केला. सकाळी प्रशासनाच्या लक्षात हि बाब आल्यानंतर महसूल व पोलीसप्रशासनाने केंजळ गावाकडे धाव घेतली त्यामुळे तरुणांनी सुद्धा केंजळ येथील चावडीसमोर प्रचंड गर्दी केली.यावेळी ग्रामस्थ वप्रशासनादरम्यान झालेल्या बैठकीत प्रशासनाच्यावतीने बेकायदेशीरपणे बसविलेला स्मारक सन्मानपूर्वक काढून ग्रामपंचायत कार्यालयातकिंवा अन्य सुरक्षित स्थळी ठेवण्याची विनंती करण्यात आली. नंतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून रीतसर जिल्हाधिकारीकार्यालयातून परवानगी घेऊन स्मारक स्थापना करण्यात यावी असे सुचविण्यात आले मात्र स्मारक हलविणार नाही अशी उपस्थिततरुणांनी भूमिका घेतल्यामुळे काही काळ गावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
दरम्यान हि बाब समजल्यावर प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले यांनी केंजळ येथे धाव घेतली व काही झाले तरी स्मारक हटविण्यात येणार नाही असे प्रशासनाला सांगितले. त्यांच्यासोबत वाई भाजपाचे सरचिटणीस सचिन घाडगे, विवेक भोसलेकार्यकर्त्यांसह उपस्थित झाल्याने केंजळ ग्रामपंचायत कार्यालयात पुन्हा या सर्वांची तहसीलदार रणजीत भोसले, अतिरिक्त डी. वाय. एस. पी. गणेश किंद्रे, वाईचे पो.नि. बाळासाहेब भरणे, भुईंजचे स.पो.नि. आशिष कदम व त्यांचे सहकारी यांच्यासोबत मिटिंग झाली वत्यात स्मारक ची देखभाल व रक्षण करण्यात येईल मात्र स्मारक हटवणार नाही हि ग्रामस्थांनी भूमिका घेतल्याने प्रशासनाच्या वतीने पुन्हा ग्रामस्थांना स्मारक हटविण्याची विनंती करण्यात आली मात्र एकदा स्थापन केलेला स्मारक हटविला तर तो आमच्याकडून महाराजांचाअपमान होईल असे यावेळी उपस्थित शिवभक्तांनी व तरुणांनी सांगून स्मारक हटविण्यास नकार दिला आहे. अजूनही ग्रामस्थ व प्रशासनयांच्यातून कोणताही योग्य तोडगा निघत नसल्याने परिस्थितीमध्ये तणावाचे वातावरण असून ग्रामस्थ व प्रशासनाच्या बैठकांचे सत्रदिवसभर सुरूच आहे.
विजयाताई भोसले : मला अटक करा पण स्मारक हटवू नका… विजयाताई भोसले
प्रशासनाने रीतसर परवानगी घेऊन स्मारक पुनर्स्थापित करण्याची व सध्या स्मारक हटविण्याची विनंती केल्यानंतर विजयाताई भोसलेम्हणाल्या कि प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम व कबरी काढण्यासाठी आम्हीं न्यायालयीन व सर्व बाबींनी लढा दिला. कायदेशीरपाने कबरी काढाव्या लागतील हे सिद्ध करूनसुद्धा प्रशासन तेथील कबरी हटवत नाही. मग आत्ताच केंजळ येथील स्मारक हटविण्यासाठी प्रशासन जबरदस्ती का करीत आहे. यावेळी हवे तर तुम्ही मला अटक करा पण स्मारक हटवून देणार नसल्याचे यावेळीविजयाताई भोसले यांनी सांगितले.












Leave a Reply