दहिवडी प्रतिनिधी
दहिवडी शहर पञकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे रुपेश कदम यांची उपाध्यक्ष पदी दैनिक पुढारीचे पञकार राजेश इनामदार सचिवपदी दैनिक तरुण भारतचे पञकार लालासाहेब दडस तर खजिनदारपदी दैनिक लोकमतचे नवनाथ जगदाळे यांची निवड करण्यात आली .
प्रारंभी भारतरत्न लता मंगेशकर व दहिवडी येथील फोटो ग्राफर महेश स्वामी यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली वहाण्यात आली.
या वेळी मागील कामकाजाचा आढावा घेण्यात आला.माणतालुका जलसंधारणामध्ये तसेच जिहे कटापूर उरमोडी योजनेच्या पाठपुराव्या संदर्भात केलेला लेखणीचा आढावा घेण्यात आला.हरीत वसुधंरा या सह दहिवडी शहरासाठी विविध उपक्रम राबवणे तसेच एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर न्याय देणे दहिवडी शहराला प्रगतीपतावर नेण्यासाठी आपल्या लेखणीचा वापर व्हावा या साठी विचार विनिमय करण्यात आला.
या वेळी कार्यकारणी सदस्य म्हणून दौलत नाईक,पिंटू माळवदे उमेश बुधावले ,प्रविणराजे ,नवनाथ भिसे यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल विविध पक्षाचे नेते दहिवडीचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक सहकारी संस्था प्रशासकीय अधिकारी सामाजिक संस्था यांनी अभिनंदन केले.












Leave a Reply