आज जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडीच्या सभेचे आयोजन
सातारा : जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण सहविचार सभेचे आयोजन सोमवार दि.७ रोजी दुपारी ३ वा.जिल्हा संपर्क कार्यालयात करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर व बंधित बहुजन युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेशभाऊ विश्वकर्मा यांच्या आदेशाने जिल्हा कार्यकारीणी विस्तार व सर्व तालुका कार्यकारीणी पदाधिकारी निवडीसाठी सर्व इच्छुक कायकर्ते यांच्या मुलाखती होणार आहेत.
तेव्हा जिल्ह्यातील सर्व कायकर्ते यांनी वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये काम करू इच्छिणा-यांनी मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित रहावे. मुलाखतीला येताना ऑनलाईन सदस्य नोंदणी आवश्यक आहे. यावेळी युवा प्रदेश सदस्य ऍड. सचिन जोरे, ऋषीकेश नांगरे – पाटील व विश्वजीत कांबळे तसेच जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई आदींच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखती होणार आहेत.













Leave a Reply