समाजाची व्यसनमुक्ती हीच खरी राष्ट्र शक्ती …

समाजाची व्यसनमुक्ती हीच खरी राष्ट्र शक्ती …बरोबर ना..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कोणालाही आपल्या बापाने अथवा मुलाने व्यसन केलेले आवडणार नाही . जावई सुध्दा व्यसनमुक्त हवा असतो….

अनेकांच्या आयुष्यात गंमत,मित्रांच्या संगत ,उत्सुकता यातून दारुची सुरुवात होते… आणि कधी व्यसनाची सवय लागते हे त्यांच्या ही लक्षात येत नाही.. जेव्हा लक्षात येते, तेव्हा व्यसन केल्या शिवाय मन आणि शरीर साथ देत नाही. अहो,दारूपुढे मेंदूच गुलाम होतो.

आईची माया,बायकोचे प्रेम आणि मुलांची ओढ दारूत विरघळून जाते. कौटुंबिक सुखाची वाट लागते, पैशाची बरबादी होते, सामाजिक प्रतिष्ठा कमकुवत होते….

दारुची खरी भयानकता काय असते, हे ज्याचा बाप,मुलगा, भाऊ,पती,बहिणीचा नवरा,नातू यांच्या पैकी एकाला विचारा…घरात काय जीवन जगतात,समजून घ्या….हे पुस्तकात शब्दात लिहता ही येणार नाही. एवढी करूण कहाणी ऐकायला मिळेल.

सरकारला दारु विक्री पासून महसूल मिळतोय.. त्यामुळे दारु विक्रीला प्रोत्साहन देणार…दुकानदार पैशाचे आमिष दाखवून गाव पुढाऱ्यांचे सहकार्य घेणार…. साम,दाम,दंड काही ही करून दारू विक्रेते गावात दुकान सुरू करण्याचा प्रयत्न करतील…

सावधान… एकदा दारु दुकान सुरू झाले की ते बंद करणे,प्रचंड अवघड होते…यापेक्षा ते सुरू होणार नाही. यासाठी प्रखर विरोध केला पाहिजे… प्रसंगी कायद्याच्या आव्हान देण्यासाठी तयार रहा…महिला, युवक ,जेष्ट नागरिकांनी संघटन करून दारु दुकान गावाच्या हद्दीत सुरु होऊ देऊ नका….

यासाठी सदैव एक कार्यकर्ता म्हणून आवाज द्या, नक्कीच शक्य ती मदत करू…

चला,व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी प्रामाणिक पणे कार्यकर्ते म्हणून काम करू या….

-मदन साबळे, छत्रपती उदयनराजे मित्र मंडळ वडूथ, सातारा
जिल्हाध्यक्ष नमो नमो मोर्चा भारत, सातारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *