सर्वसामान्यांवरील अन्याय होत असेल तर आम्ही अन्यायाला विरोध करणारच श्री. छ. खा.उदयनराजे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा एमआयडीसी ची तसेच गोरगरीब, सर्वसामान्य कामगारांची दुर्दशा कोणामुळे झाली याची संपूर्ण माहिती सातारा जिल्ह्यातील जनतेला आहे.

सातारची एमआयडीसी स्थापन झाली त्यावेळी आम्ही तीसरीमध्ये होतो आणि त्यांचा तर जन्म नव्हता. तत्कालीन लोकप्रतिनिधी, त्यानंतरचे लोकप्रतिनिधी व ज्यांचा बालकमंत्री म्हणून उल्लेख केला गेला होता, या सर्वांच्या कचखाऊ वृत्तीमुळे, बांधकामास सुरुवात करणारी डॉ.बेग, इंडीयन सिमलेस पाईप्स, एल & टी यांच्या सारख्या अनेक कंपन्या रातोरात दुसरीकडे गेल्या. या अश्या कारणांमुळे एमआयडीसीची खरी वाट लागली हे त्यांना सुध्दा माहीती आहे. परंतु त्यांना जळी, स्थळी, काष्ठी सर्वत्र उदयनराजेच दिसतात म्हणून आमच्या नावाने नेहमीप्रमाणे ओकतात.

साताराबरोबरच सुरु झालेली नगरची एमआयडीसी आज मात्र कुठच्या कुठे गेली आहे. त्यांनी वस्तुस्थिती समजून घेवून वक्तव्य करावे. साप समजुन भुई थोपटण्याची सवय सोडावी. पडद्या आडून गुन्हे करणाऱ्या (व्हाईट कॉलर) क्रिमिनल्सनी दुस-यांवर आरोप करणे त्यांना शोभुन दिसते. त्यांनी केलेल्या आरोपांना आपण आणि सामान्य जनता काडीचीही किंमत देत नाही.

वय वाढलं कि बाल बुध्दी येते मग राजकारणातील त्यांच्या पेक्षा सर्व जेष्ठ व्यक्तींचीही बालबुध्दी आहे असेच त्यांना म्हणायचे आहे का. असे असेल तर मात्र नक्कीच मोठा मानसिक धक्का त्यांना बसला असावा आणि आता उपचाराची तातडीने गरज आहे. त्यांच्या बालबुध्दी वक्तृत्वाची त्यांच्या पेक्षा जेष्ठ असलेल्या राजकारणी व्यक्ती नक्कीच नोंद घेतील आणि ते सर्व मिळुन त्यांना आणखी पक्षविरहीत धक्के देतील. काळजी वाटते.
थंड रक्ताचे नाही.

सर्वसामान्यांवरील अन्याय होत असेल तर आम्ही त्यांच्यासारखे अन्यायाला विरोध करणारच पंडीत अॅटोमोटिव्हच्या जागेसह सर्वच व्यवहार झालेल्या जागांची न्यायालयीन चौकशी लावणारच आहे त्यात सर्व काही बाहेर येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *