शेंद्रे-कागल राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करण्याकरीता तसेच सातारा जिल्ह्यातील विकासकामांसाठी २००९ कोटी रूपये.
खंबाटकी दुसऱ्या बोगद्याच्या उर्वरित कामासाठी ४९३ कोटी आणि कराड-चिपळुण नवीन राष्ट्रीय महामार्गाचे कामासाठी असे मिळुन, सुमारे ३००० कोटी रूपयांची उपलब्धता करण्यात आली आहे. तर प्रतापगड अजिंक्यतारा आणि सज्जनगड रोप-वे च्या प्रस्तावाला ना.नितिन गडकरी यांनी तत्वत: मंजूरी देवून, पुरेसा निधी देण्याचे मान्य केले आहे. रोप-वे मुळे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या सातारा जिल्हयाच्या विकासाला एक वेगळी उंची आणि चालना मिळणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाकरीता तसेच
बोगदयाच्या कामाकरीता निधीची मागणी, सातारा जिल्हयातील तीन ठिकाणच्या रोप-वे चा दिलेला प्रस्ताव तसेच सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या विविध विकासकामांचा पाठपुराव्याच्या अनुषंगाने चालु अधिवेशन काळात, रस्ते वाहतुक आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंत्रालयात सादर केलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करताना, किल्ले अजिंक्यतारा, किल्ले प्रतापगड आणि सज्जनगड या किल्ल्यांवर जाण्यासाठी रोप-वे चा प्रस्तावास ना.नितिन गडकरी यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. त्यासाठी आवश्यक तो
निधी लवकरच प्रदान करण्यात येईल असे ठामपणे सांगीतले आहे.
तसेच राष्ट्रीय महामहार्गाचे शेंद्रे ते कागल टप्यातील सहापदरीकरणाचे कामास रूपये २००९ कोटी
आणि खंबाटकी बोगद्याच्या उर्वरीत कामासाठी ४९३ कोटी रूपये, तर चिपळुण ते कराड या नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी देखिल मोठा निधी उपलब्ध करून दिल्याचे ना.नितिन गडकरी यांनी सांगीतले.
कामाची निकड आणि आमची मागणी विचारात घेवून, नागरीकांच्या हितासाठी सुमारे ३००० कोटी
रूपयांपेक्षा जास्त निधीची उपलब्धता करून दिल्याबददल ना.गडकरी यांचे आभार मानलेच तथापि तमाम जनतेच्या वतीने धन्यवाद देखिल दिले आहेत.
Nitin Gadkari @gadkari.nitin












Leave a Reply