शिवथर भुयारी मार्ग जीवघेणा रेल्वे प्रशासनाने केलेल्या भुयारी मार्गाच्या बोगद्यात वाहन चालकांना जीवघेणा प्रवास

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शिवथर ता २५ शिवथर कोरेगाव ला जोडल्या जाणाऱ्या सेवा रस्त्यावर शिवथर नजीकच्या रेल्वेचे दुहेरी कारणाचे काम सुरू असून रेल्वे प्रशासनाने केलेल्या भुयारी मार्गाच्या बोगद्यात वाहन चालकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय दरम्यान शिवथर कोरेगावं ला जोडणाऱ्या मार्गावर ऊस वाहतूक फार मोठ्या प्रमाणावर होत होती रेल्वेने केलेल्या बोगद्यातून जात आसताना सेवा रस्त्यावर उंची जास्त झाल्याने ऊस वाहतूक दारांनाही डोकेदुखी ठरली असून सद्या भागातील ऊसतोडी सुरू असून शिवथर मालगाव गोवे वनगळ वडुथ आरफळ या भागातून जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांला फार मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवला जात असतो गेल्या दोनवर्षापासून सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाची दै सकाळने आवाज उठवला होता त्या वेळी रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याच्या कामाची दखल घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावले होते मात्र सद्य परिस्थिती मध्ये रेल्वे प्रशासनने मनमानी करीत या सेवा रस्त्यावर सिमेंट कॉक्रिटचा घाट घालत प्रवाशांच्या जीवाशी खेळत असून सद्या वडुथ सातारारोड बोगद्याचे काम सुरू असलेने या मार्गावरील संपूर्ण वहातुक शिवथर मार्गे वळवण्यात आली असून या मार्गावर दररोज शेकडो वाहने ये जा करीत असून रेल्वेने केलेल्या सिमेंट रस्त्याचे कामही अपुऱ्या प्रमाणात केले असून या ठिकाणी अपघाताचे प्रमाणही वाढले असून या बोगद्यातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना समोरासमोर व्हावे दिसत नसल्याने अपघात होऊन कित्येकांना या रस्त्यामुळे फार मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले असून यामार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करून घेऊन रेल्वे प्रशासन रस्ता सुस्थितीत करून ट्रॅक्टर एसटी चालकांची होणारी ससेहोलपट थांबवावी अन्यथा आंदोलन करू असा इशाराही खा,छत्रपती उदयनराजे मित्र मंडळाच्या मदन साबळे यांनी दिला आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *