20 हजाराच्या लाचेची मागणी प्रकरणी सातारा जिल्ह्यातील माण तालुका तहसिलदाराचा वाहनचालक लाच लुचपतच्या जाळ्यात सांगली लाच लुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई

20 हजाराच्या लाचेची मागणी प्रकरणी तहसिलदाराचा वाहनचालक लाच लुचपतच्या जाळ्यात सांगली लाच लुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा ता,२५ (प्रतिनिधी) तहसीलदार यांच्या वाहनावरील चालकाने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी प्रकरणी सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवक कृष्णदेव ऊर्फ किसन दत्तात्रय गुजर , ( वय ३४ वर्ष) कोतवाल राणंद ता . माण जि. सातारा व तहसिलदार यांचे शासकीय वाहनावरील चालक , रा . मु.पो. राणंद ता.माण जि . सातारा यास अटक करून न्यायालयाने त्यांस 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या बाबत सांगली लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रार दाराने सांगली लाच लुचपत प्रतिबंध विभागात लेखी तक्रारी अर्ज दिला होता. तक्रारदार यांचा वाळु , माती , मुरूम वाहतूकीचा व्यवसाय तहसिलदार दहिवडी यांना सांगून सुरू करून देण्यासाठी किसन गुजर , कोतवाल यांनी तक्रारदार यांचेकडे प्रत्येक महिन्याला २५,००० / – रूपये प्रमाणे लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज दि . २८ डिसेंबर २०२१ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली यांना दिला होता . तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जानुसार दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक किसन गुजर , कोतवाल यांनी तक्रारदार यांचा वाळु , माती , मुरूम वाहतूकीचा व्यवसाय तहसिलदार दहिवडी यांना सांगून सुरू करून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे प्रथम २५,००० / – रूपये लाचेची मागणी करून चर्चेअंती २०,००० / – रूपये लाचेची मागणी करून वाळु , माती , मुरूम वाहतूकीचा व्यवसाय सुरू करण्यास सांगीतले असल्याचे निष्पन्न झाले आहे . त्यानंतर लोकसेवक श्री . किसन गुजर , कोतवाल यांना तक्रारदार यांचेवर शंका आल्याने लोकसेवक किसन गुजर , कोतवाल यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम स्विकारली नाही . लोकसेवक श्री . कृष्णदेव ऊर्फ किसन दत्तात्रय गुजर , वय ३४ वर्ष कोतवाल राणंद ता . माण जि . सातारा रा.मु.पो. राणंद ता . माण जि . सातारा यांचे विरुध्द दहिवडी पोलीस ठाणे जि . सातारा येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे . पुढील तपास ला.प्र.वि. सातारा यांचेकडील अशोक शिर्के पोलीस उप अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री गिरी हे करीत आहेत . सदरची कारवाई . पुणे लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उप आयुक्त राजेश बनसोडे , पोलीसअधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस उप आयुक्त / अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे सुहास नाडगौडा अपर पोलीस उप आयुक्त अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सुजय घाटगे , पोलीस उप अधीक्षक तसेच पोलीस कर्मचारी , अविनाश सागर , प्रितम चौगुले , संजय संकपाळ , भास्कर भोरे , चालक बाळासाहेब पवार यांनी कारवाई केली आहे .

या सर्व प्रकारा बाबत आज मुख्यमंत्री कार्यलयात तक्रार दाखल करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी माण मधील सर्व गावच्या महसूल विभागाच्या गावच्या कार्याचे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *