दहिवडी: नरवणे गावचा मजूर तलाठी गावात न येता तहसीलदार कार्यालयातून काम करतो ते पण दिवसातून फक्त एक तास हजर असतो गावाकडे आल्या च लोकांना माहीत नाही लोकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या पण पण हा मजोर तलाठी गावाकडे फिरकला नाही शेवटी विद्यार्थी व शेतकऱ्यांनी या तलाठ्यांच्या बाबत पत्रकार आणि नंतर थेट मुख्यमंत्री यांच्या कडे तक्रार केली पण मुख्यमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली मुख्यमंत्री याचा कडे तक्रार करूनही जर तलाठी गवत येत नसेल तर मुख्यमंत्री यांच्या पेक्षा नरवणे गावचा तलाठी मोठ्या पदावर आहे असेच म्हणावे लागेल आणि सगळी जनतेत हीच चुळबूळ सुरू आहे गेली अनेक दिवस एसटी बंद आहे नरवणे गाव हे दुर्गम भागात मोडते असे असताना विद्यार्थ्यांना दाखले काढण्यासाठी 25 किलोमीटरवर पायपीट करावी लागते शेतकऱ्यांना सरकारी बी बियाणे घायची असतील तर सात बारा उतारा लागतो पण हा तलाठी गायब असतो मुख्यमंत्री यांना तक्रार करून जर हा तलाठी गावात येत नसेल तर जनतेने दादा मागायची कोणाकडे असा प्रश्न जनतेला पडला आहे आता मुख्यमंत्री म्हणून जी कारवाई करता येईल ती कारवाई सदर व्यक्तीवर करावी व इथल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यात यावा ही जनतेची भावना आहे
मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडे तक्रार करूनही नरवणे चा तलाठी तुम्हाला दादा देत नाही आम्ही काय करायचं नरवणे गावच्या युवकांचा सवाल













Leave a Reply