मराठी भाषिकावर अन्याय करणाऱ्या कर्नाटक राज्यात राष्ट्रपती राजवट लावा: विलास देसाई मराठा क्रांती मोर्चा समनवयक
मुंबई: वार्ताहर मराठा भाषिकावर होणार सतत चा अन्याय पाहता कर्नाटक हा प्रदेश भारतीय घटने नुसार चालतो काय? हा प्रश्न देशातील जनतेला निर्माण झाला असून जर कर्नाटकात इतका मोठा अन्याय सामान्य जनतेवर होत असेल तर त्याची दखल मा राष्ट्रपती यांनी घ्यावी यासाठी मराठा क्रांती मोर्चा मा राष्ट्रपती यांना पत्र लिहणार असून लवकरात लवकर या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी त्याची भेट घेतली जाईल व राष्ट्रपती राजवट लावण्याची विनंती करून भारतीय घटनेच्या नियमानुसार राज्यकारभार चालावा अशी विनंती आम्ही मा राष्ट्रपती याना करू असे परखड मत मराठा क्रांती मोर्चा समनवयक विलास देसाई यांनी मांडले सरकार ला कायद्याने राज्य चालवत येत नसेल तर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा मा राष्ट्रपती यांच्याकडे मागणी करणार असल्याचे विलास देसाई मराठा क्रांती मोर्चा समनवयक यांनी आज सांगितले महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय कराल तर आक्रमक उत्तर देऊ: विलास देसाई मराठा क्रांती मोर्चा समनवयक
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय कराल तर आक्रमक उत्तर देऊ कर्नाटक हा देशातील भाग आहे कर्नाटकात कायद्याचे राज्य नाही काय प्रत्येक वेळी मराठा भाषिकांना अन्याय सहन करावा लागत आहे आत तर मराठा एकीकरण समितीच्या नेत्यावर थेट हल्ले होत आहेत शाई फेकली जात आहे ,मा दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे झालेला भ्याड शाई हल्ला अत्यंत निंदनीय असून त्याचा तीव्र निषेध मराठा क्रांती मोर्चा करत आहे . दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला हा संपूर्ण मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक, सुनियोजित केलेला हल्ला आहे. या संतापजनक घटनेमुळे मराठी भाषक चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. उलट मराठी भाषक चळवळ आणखी जोमानं उसळी घेऊन पुढे जाईल. या घटनेमुळे मराठी भाषक एकदिलानं एकत्र येत लढा आणखी मजबूत करतील. एकीकरण समितीचे नेते दीपक दळवींसह मराठी भाषक चळवळीच्या मागे संपूर्ण मराठा क्रांती मोर्चा व महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे. मराठीचा आवाज कदापी दबणार नाही. सीमाभागातील मराठी भाषकांचा हक्क जपणे, त्यांच्या अस्मितेचे संरक्षण करणे, सीमाभागातील मराठी बांधव सनदशीर मार्गानं, लोकशाही मार्गानं लढत आहेत, त्यांच्या पाठीशी राहणं, हे आमचं कर्तव्य आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या कोणत्याही मराठी सैनिकावर झालेला हल्ला आम्ही या पुढे खपवून घेतला जाणार नाही. मराठी भाषक चळवळीला धक्का देण्यासाठी हे भ्याड कृत्य सुनियोजित पध्दतीनं करण्यात आलं असावं. मात्र अशा घटनांमुळे मराठी भाषक आंदोलनावर, चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. लढणं हे मराठी भाषकांच्या रक्तात आहे. त्यामुळे मराठी भाषकांना जेवढं दाबण्याचा प्रयत्न होईल; तेवढी मराठी भाषकांची चळवळ आणखी उसळी घेईल. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या मराठी सैनिकामागे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस, महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे.हे कर्नाटक सरकारने लक्ष्यात घ्यावे व कर्नाटक मध्ये वेळ पडली तर राष्ट्रपती शासन लागू करावे या बाबत लवकरच राष्ट्रपती ना निवेदन देण्यात येईल व कर्नाटक सरकारने कायद्याने चालावे अन्यथा महाराष्ट्र राज्यातील जनता कर्नाटक राज्यात होणाऱया अन्यायाला वाचा फोडेल असा इशारा विलास देसाई यांनी दिला.













Leave a Reply