अनेक वर्षे कुकुडवाड जिल्हा परिषद गटातील गावचे झालेले विकासाचे नुकसान भरून काढण्यासाठी कुकुडवाड पंचायत समिती गणाची निवडणूक जनतेच्या आग्रहाखातर लढवणार :सतीश जाधव
दहिवडी: स्वतंत्र झाल्या पासून माण तालुक्यातील कुकुडवाड परिसराला कोणत्याही विकासाच्या योजना मिळाल्या नाहीत अतिशय दुर्गम आणि भकास भाग करण्याचे सर्वात मोठे पाप राजकीय नेत्यांनी केले असून फक्त फसवाफसवी व निवडणूक काळात चिरीमिरी आश्वासन देऊन परिसरातील युवकांना मातीकाम ऊसतोड करण्यासाठी येथून स्थलांतरित करून उपजीविका करावी लागते राजकारण म्हणजे मी मोठा कसा असेन आणि जनता म्हणजे निवडणुकीत वापरण्याचे एक साधन आहे असाच गैरसमज येथील नेत्याना झालेला दिसतो आहे म्हणून या कुकुडवाड परिसरातील जनतेची मागणी पाहता ही निवडणून सहज व धनशक्ती च्या विरोधात जनशक्ती अशी होऊ शकते म्हणून युवकांच्या मागणीला दुजोरा देत कुकुडवाड जिल्हा परिषद किंवा कुकुडवाड पंचायत समिती ची येणारी निवडणूक मी ताकतीने युवकांच्या पाठींबा घेऊन लढवणार आहे
इथला गरीब हलाकीचे जीवन जगत आहे आज या परिसरातील युवक शिक्षित असूनही मातीकाम करण्यासाठी वसई सारख्या दुर्गम प्रदेशात जात आहे तिथे आपले जीवन जगत आहे या परिस्थिती कडे जनतेने गंभीर होऊन विचार करून बदल घडवला पाहिजे आजच्या परिस्थितीत कुकुडवाड जिल्हा परिषद गटात परिवर्तन करण्यासाठी जनता स्वतःहून एक पाऊल पुढे येत आहे हे या गटाचे वैशिष्ट्य मानावे लागेल
कुकुडवाड गटाचा च्या अंतर्गत डोगरी प्रदेशात राहणारे काही भाग मोडतात आज या वाड्या वस्त्यावर पक्का रास्ता झालेला नाही स्थानिक स्वराज संस्थे मधून जी कामे करायची आहेत ती होऊ शकली नाहीत त्याचा परिणाम आज इथली जनता भोगत आहे हे कुठे तरी थांबले पाहिजे अशी या भागातील जनतेची अपेक्षा आहे
म्हणूनच सतीश जाधव यांनीच निवडणूक लढवावी अशी मागणी कुकुडवाड परिसर मित्र समूह यांच्या माध्यमातून होत आहे.विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवली जाईल तसेच युवकाचे प्रश घेऊन जनतेत जाऊ व प्रस्थापित लोकांनी केलेल्या दुर्दशेचा पाढा लोकांना सांगू प्रत्येक निवडणूक फसवणूक होतेच असे नाही मतदार अतिशय हुशार असतो योग्य वेळी निर्णय घेण्याची धमक मतदाराच्या मधे आहे हे आत विसरून चालणार नाही.













Leave a Reply